लाडू हा आपल्या खाद्यसंस्कृतीतील एक गोडाचा पदार्थ आहे. लाडू कोणाला आवडत नाही. लाडू हा पदार्थ अनेक वेगवगेळ्या प्रकारे बनवला जातो. संसमारंभात, लग्नावेळी किंवा कोणत्या खास क्षणी घरात लाडू तयार केले जातात. लाडू बनवणे तसे थोडे अवघडच मात्र आज आमही तुमच्यासोबत लाडूची एक सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी शेअर करत आहोत.
तुम्ही याआधी बेसनाचे, मेथीचे असे अनेक लाडू खाल्ले असतील मात्र तुम्ही कधी उरलेल्या चपातीचे लाडू खाल्ले आहे का? नाही ना… मग आज बनवून पहा. चपाती हा आपल्या घरात बनवला जाणारा एक सामान्य पदार्थ आहे. अनेकदा ही चपाती जास्तीची बनते आणि दुसऱ्या दिवशी हिचे काय करावे ते सुचत नाही अशा वेळी तुम्ही यापासून रुचकर असे गोड लाडू तयार करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू आता घरीच बनवा, वाचा सोपी रेसिपी







