गौतम अडानीच्या मुलाचे जीत आणि दिवाचे लग्न संपन्न (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेले आणि अब्जावधी संपत्तीचे मालक गौतम अदानी यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता ७ फेब्रुवारी २०२५ रोजी जीत अदानी आणि दीवा शाह यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. अदानी कुटुंबात ‘छोटी बहू’ आता आली आहे. पती-पत्नी झाल्यानंतर या जोडप्याचा पहिला फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये शाही स्थळ आणि वधू-वरांचा शाही लुक पाहण्यासारखा आहे.
दिवा आणि जीतने असे कपडे घातले होते ज्यांची रंगसंगती एकमेकांशी जुळणारी होती. साधेपणा असूनही, तिच्या लुकमध्ये दिसणारी समृद्धता सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सर्वाधिक लक्ष वेधले ते तिच्या हिऱ्यांच्या दागिन्यांनी. पाहा दिवाचा लक्षवेधी लुक नक्की कसा आहे (फोटो सौजन्य – Instagram)
हिऱ्यांमधील मढली अडानीची सून
दिवा शाहचे डोळे दिपवून टाकणारे हिऱ्यांचे दागिने
गुजरातमधील सर्वात मोठा हिरा व्यापारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैमिन शाह यांच्या मुलीचे लग्न झाले आणि दागिन्यांमध्ये राजेशाही लुक येणार नाही हे कसे शक्य आहे? जीत आणि दिवाच्या लग्नाचे जे फोटो समोर आले आहेत ते स्पष्टपणे सांगतात की प्रत्येक हिरा तिच्यासाठी खास निवडून तयार केला गेला असावा.
वधूने पोल्की अर्थात कुंदन, पाचू, सोने आणि माणिकांनी सजवलेला एक जाड चोकर नेकलेस घातला होता. दिवाच्या दोन्ही हातांवर मॅचिंग हिऱ्याच्या बांगड्या दिसत होत्या. कानातले डँगलर आणि मांगटिका देखील या सेटचा भाग होते. म्हणजे त्यांच्या डिझाईन्सही जुळत होत्या.
पारंपारिक आणि आधुनिकतेचे मिश्रण
जीत अडानी आणि दिवा शाहचा शाही लग्नसोहळा
दिवाने तिच्या लेहेंग्याच्या निवडीमध्ये ट्रेंडी आणि पारंपारिक पोशाखाचे अद्भुत मिश्रण डिझाईन निवडले. फ्लेअर्ड प्लेटेड स्कर्टचा भाग हस्तिदंती अर्थात Ivory रंगाचा होता आणि तो जरी आणि मौल्यवान क्रिस्टल्सने सजवलेला होता. काही दिवसांपूर्वी असेही बातम्यांमध्ये सांगण्या आले होते की लेहंग्यावर जडविण्यात आलेले क्रिस्टल्स नसून मौल्यवान हिरे आहेत.
स्कर्टची बॉर्डर मरून रंगाची ठेवण्यात आली होती आणि त्यावर जरदोसीचे बारीक नक्षीदार काम करण्यात आले होते. आणि दुपट्ट्याच्या काठावरही तोच नमुना पुनरावृत्ती होताना दिसला. या दिवाने एक कॉन्ट्रास्टिंग कॉम्बिनेशन घातले होते आणि मरून रंगाचा मसलिन ब्लाउज घातला होता. प्रिन्सेस कट नेकलाइन सोनेरी बॉर्डरने हायलाइट केली होती तर सोनेरी धाग्याच्या वेल वर्कने एकूण ड्रेसचे सौंदर्य वाढवले होते.
राजघरण्यातील महाराणीने परिधान केली 100 वर्ष जुनी पैठणी; कोण आहेत या सौंदर्यवती ?
जीत अडानीचा लुक
दरम्यान जीत अदानीच्या शेरवानीचा रंग आणि प्रिंट दिव्याच्या लेहेंग्याशी जुळत होता. त्याच्या पुढच्या बाजूला सोनेरी बटणे लावण्यात आली होती. आयव्हरी कपड्यांसह, त्याने माणिक हार घातला होता तर डोक्यावर रेशमी पगडी घातली होती आणि त्यावर एक सोन्याचा ब्रोश सजवलेला होता. या लुकमध्ये जीत खूपच देखणा दिसत होता.