(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
महाराष्ट्राच्या लोककलेत खोलवर रुजलेली बारी आणि वारीची परंपरा आता रंगभूमीवर नव्या रुपात अनुभवायला मिळणार आहे. ‘संगीत बारी ते वारी’ हे नवे संगीतमय नाटक रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय मेजवानी ठरणार आहे. या नाटकात वारीची भक्तीभावाची झलक, लोककलेचा ठसा, तसेच जीवनातील संघर्ष आणि आनंद यांचे अप्रतिम चित्रण पाहायला मिळणार आहे. गायन, वादन, नृत्य आणि नाटक यांचा संगम घडवणारे हे प्रयोग प्रेक्षकांना रंगतदार अनुभव देणार आहेत.
Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट, चाहत्यांनी मेकर्सवर केले आरोप
मेघा वि.रा.एंटरटेनमेंट निर्मित ‘संगीत बारी ते वारी’ या नाटकाची संकल्पना मेघा घाडगे यांची असून या नाटकाचे लेखन नचिकेत दांडेकर यांनी केलं आहे. नाटकाचे दिग्दर्शन संकेत पाटील यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन योगेश देशमुख यांचे असून, संगीताची जबाबदारी आशुतोष वाघमारे यांनी सांभाळली आहे. आणि गीते अनिकेत कदम यांची आहेत. नेपथ्य देवाशिष भरवडे, प्रकाशयोजना कुलभूषण देसाई आणि प्रणाली, मेघा, प्रज्ञश्री यांनी केलेल्या वेशभूषेचा अप्रतिम मिलाफ या नाटकात अनुभवायला मिळणार आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्या सोबत संजना पाटील, शिरीष पवार, विद्याधर नामपल्ले आणि इतर कलाकारही या नाटकात दिसणार आहेत. सप्तसुर म्युझिक चॅनल म्युझिक पार्टनर आहे. खुशबू जाधव या नाटकाच्या सहनिर्माती असून आगामी काळात महाराष्ट्रभर हे नाटक रसिकांसमोर येणार आहे. लोककलेची परंपरा रंगभूमीवर नेणारे हे नाटक नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील, असा विश्वास या नाटकाचे निर्माती मेघा घाडगेने व्यक्त केला आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या कारचा अपघात, नव्या कोऱ्या मर्सिडीज बेन्झची वाईट अवस्था
संगीत नाटक “संगीत बारी ते वारी” ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे खूप दिवसांनी तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी वेगळं आणि नवीन घेऊन आली आहे. आता या नाटकाचे प्रयोग नक्कीच हाऊसफुल होतील अशी आशा आहे. तसेच त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असे मेघा घाडगेचे म्हणणे आहे.