कायमच्या गोळीपासून मिळेल सुटका! दैनंदिन आहारात नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन
चुकीचा आहार , बिघडलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, शरीरात सतत होणारे हार्मोनसचे असंतुलन, जंक फूडचे अतिसेवन, तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात उच्च रक्तदाबाची समस्या वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे स्ट्रोक येणे, हृदयविकाराचा झटका येणे, रक्तवाहिन्या फुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. उच्च रक्तदाब शरीरात वाढल्यानंतर बरीच लक्षणे शरीरात दिसू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात वाढलेला लठ्ठपणा आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय वाढलेल्या वजनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात कमी कॅलरीज युक्त पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पौष्टिक पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय आहारात कमी कॅलरीज, उच्च प्रथिने आणि फायबर असलेल्या पदार्थांचे भरपूर सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि लठ्ठपणा कमी होतो.
शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे ज्वारी पीठ, संपूर्ण ओट पीठ आणि बार्ली पिठाचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात सकारात्मक बदल दिसून येतील. याशिवाय मसाल्यांमध्ये तुम्ही धणे, वेलची, हळद आणि लसूण या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
शरीरातील हाडांसाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचे आहे. रोजच्या आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवणार नाही. नियमित दूध, पनीर, सोयाबीन, नट्स इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन करावे. शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात दह्याचे भरपूर सेवन करावे. कॅल्शियम कमी झाल्यानंतर झोपेची गुणवत्ता खराब होऊन जाते.
शरीराला सर्वच घटकांची आवश्यकता असते. त्यातील सगळ्यात आवश्यक जीवनसत्व म्हणजे पोटॅशियम. पोटॅशियम वाढवण्यासाठी आहारात पालक, ब्रोकोली, किवी आणि रताळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहील.