तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? मग रोजच्या आहारात करा 'या' चटणीचा समावेश
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस पांढरे होतात. पण हल्ली तरुण वयातच अनेकांचे केस पूर्णपणे पांढरे होत आहेत. केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. केसांवर कधी मेहेंदी लावली जाते तर कधी हेअर डाय लावून केस काळे केले जातात. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर सगळ्यांचं लाजिरवण्यासारखे वाटू लागते. केस पांढरे दिसू नयेत म्हणून वेगवेगळ्या महागड्या, आर्टिफिशियल ट्रिटमेंट किंवा पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण तरीसुद्धा केस व्यवस्थित काळे होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
केसांच्या मुळांमधील पोषण कमी झाल्यानंतर आणि केसांवर वारंवार केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केसांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी कोणत्याही केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला पिकलेल्या केसांचा पांढरेपणा कायमचा लपवण्यासाठी प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी सांगितलेला घरगुती उपाय सांगणार आहोत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांच्या मुळांना आतून पोषण मिळते आणि केस अतिशय चमकदार दिसू लागतात. याशिवाय केस गळणे, केस अचानक तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी समस्यांपासून सुटका मिळते.
पॅन गरम करून त्यात काळे तीळ व्यवस्थित खमंग लाल होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मूठभर कढीपत्ता, जिरं आणि लसूण घालून लाल होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात सुक खोबर आणि चवीनुसार चिंच घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. कढीपत्त्याच्या पानांची चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते. चटणी खराब होऊ नये म्हणून तिला पाण्याचे हात अजिबात लावू नये.
पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी केसांना वारंवार हेअर कलर, हेअर डाय किंवा इतर केमिकल ट्रीटमेंट करण्याची कोणतीच आवश्यकता नाही. केसांना पोषण देण्यासाठी आहारात कढीपत्ता आणि काळ्या तिळांची चटणी खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये कॉपर आणि आयर्न इत्यादी महत्वपूर्ण पोषक घटक आढळून येतात. केसांमध्ये मेलानिन नावाचा रंगद्रव्य आढळून येतो, ज्यामुळे महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस काळे होतात. पण केसांमधील मेलानिन कमी झाल्यानंतर केस हळूहळू पांढरे होण्यास सुरुवात होते. पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर केस अतिशय निस्तेज होऊन जातात.