नखांचा रंग फिकट झाला आहे? महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
हिमोग्लोबिन म्हणजे काय?
हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर दिसणारी लक्षणे?
हिमोग्लोबिन का आवश्यक आहे?
दीर्घकाळ निरोगी आणि कायमचउत्साही राहण्यासाठी शरीराला सर्वच पोषक घटकांची आवश्यकता असते. त्यातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे हिमोग्लोबिन. हे आपल्या रक्तातील लाल रक्तपेशींमध्ये असते. हिमोग्लोबिन शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करते. पण हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. धावपळीची जीवनशैली, मानसिक तणाव, आहारात सतत होणारे बदल आणि अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीरात असंख्य बदल होतात. मासिक पाळीमुळे होणारा रक्तस्राव, गर्भधारणा, प्रसूती, लोहयुक्त आहाराचा अभाव किंवा गंभीर आजारांची लागण झाल्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
व्हेंटिलेटर वरील रुग्णाला नवजीवन! रायगड हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या मेहनतीला मिळाले यश
शरीराला लोहाची फार आवश्यकता असते. पण याच मुख्य जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यानंतर महिलांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही, ज्यामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता सर्वाधिक जाणवते. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय पुरेशी झोप घेऊन सुद्धा शरीरात थकवा, अशक्तपणा वाढत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. याशिवाय दैनंदिन जीवनातील साधी काम करताना सुद्धा खूप जास्त थकवा जाणवतो. चेहरा, ओठ, हिरड्या किंवा नखांचा रंग नेहमीपेक्षा फिकट दिसू लागल्यास शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्याचे दिसून येते. अचानक उभं राहिल्यानंतर डोकं हलकं वाटणे किंवा चक्कर येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
First Test Tube Baby: भारतातील ‘ते’ डॉक्टर ज्यांना कधीच श्रेय मिळालं नाही, माहीत आहे का इतिहास?
थोडे चालल्यानंतर, जिने चढल्यानंतर किंवा हलका व्यायाम करताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होते. मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन न पोहोचल्यास वारंवार डोकेदुखी किंवा लक्ष केंद्रित करण्यास अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरातील रक्तभिसरण कमी झाल्यानंतर हात पाय थंड पडून जातात. माती, खडू, बर्फ किंवा कच्चा तांदूळ खाण्याची इच्छा होत असेल तर रक्ताच्या कमतरतेमुळे लक्षणे दिसू लागतात. विसराळूपणा, एकाग्रता कमी होणे किंवा सतत गुंगी असल्यास धोकादायक आजार होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि आहारात बदल करून हिमोग्लोबिनची कमी झालेली पातळी वाढवावी.
Ans: होय. नखांचा रंग फिकट होणे हे हिमोग्लोबिन किंवा लोहाच्या कमतरतेचे एक संभाव्य लक्षण असू शकते. मात्र, यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
Ans: सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, श्वास लागणे, त्वचा व नखे फिकट दिसणे, डोकेदुखी आणि हृदयाचे ठोके वेगाने धडधडणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव, गर्भधारणा, आहारात लोहाची कमतरता, व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक अॅसिडची कमतरता आणि काही आरोग्यविषयक समस्या यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते.






