भिजवलेली मगूडाळ खाण्याचा शरीराला काय फायदा होतो
चांगले आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे आणि जे लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात ते नेहमी सुपरफूड म्हणून काम करू शकतील अशा पदार्थांच्या शोधात असतात. अशीच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मूग डाळ. मूगडाळीची आमटी ही तुम्ही नियमित आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यायला हवी.
ही मूगडाळ जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवली तर तुमचे आरोग्य सुधारेल. पण तुम्ही रोज भिजवलेली मूग डाळ खाल्ल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे आपण या लेखातून जाणून घेऊया. भिजवलेल्या मुगडाळीचा शरीरावर काय परिणाम होतो याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
मूगडाळीचे आरोग्यदायी फायदे
दीपलक्ष्मी, क्लेफ्ट अँड क्रॅनिओफेशियल सेंटर आणि श्री बालाजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, चेन्नई येथील नोंदणीकृत आहारतज्ञ म्हणाल्या, “दररोज भिजवलेली मूग डाळ खाल्ल्याने तुमच्या शरीरासाठी अनेक फायदे होतात. त्यात भरपूर पोषक घटक असतात ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. एवढेच नाही तर मूगडाळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि संपूर्ण आरोग्य सुधारते.
मुगाची डाळ स्प्लिट ग्रीन हरभरा म्हणूनही ओळखली जाते आणि त्यात लोह, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम यासारखे आवश्यक पोषक घटक असतात आणि त्यात व्हिटॅमिन बी, ए, सी आणि भरपूर फायबरदेखील असते, ज्याचा शरीराला अधिक फायदा मिळतो.
डाळ शिजवताना डाळीवर आलेला फेस आरोग्यासाठी गुणकारी आहे का? जाणून घ्या सविस्तर
प्रोटीन आणि फायबरचे भांडार
दीपलक्ष्मीच्या मते, भिजवलेली मूगडाळ ही प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे वजन कमी होण्यास आणि पचनास मदत होते. त्यांनी सांगितले की, “मूगडाळ भिजवल्याने त्यातील फायटिक अॅसिड नष्ट होते आणि त्यात लोह, जस्त आणि कॅल्शियमसारख्या पोषक तत्वांचे शोषण चांगले होते आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला नाश्ता आहे.” भिजवलेल्या मूगडाळमध्ये कॅलरीज कमी असल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदयाच्या आरोग्यालाही चालना मिळते. त्यामुळे नियमित भिजवलेली मूगडाळ खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
रोजी किती प्रमाणात खावी
मूगडाळीत अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात, ज्यामुळे तुमचे पचन सुधारते. तुम्ही रोज किती मूग डाळ खाऊ शकता असा प्रश्न आता जर तुमच्या मनात आता आला असेल तर हे प्रत्येक व्यक्तीच्या क्रियाकलाप आणि गरजांवर अवलंबून असते. आपल्या शरीराच्या क्रियाकलापांनुसार हे बदलत असले तरी, दीपलक्ष्मीने सुचवले की एक माणूस दिवसातून अर्धा कप भिजवलेली मूगडाळ खाऊ शकतो.
प्रमाणात खावे
तथापि, जेव्हा सावधगिरीचा विचार केला जातो तेव्हा दीपलक्ष्मी यांनी चेतावणी दिली की मूगडाळ जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोट फुगण्यासारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात आणि युरिक अॅसिड तयार होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून, त्यांनी लोकांना सावध केले आहे आणि नुकसानीचा धोका न पत्करता फायदे मिळविण्यासाठी नियंत्रणाचे पालन करण्यासही यावेळी सांगितले आहे.
दैनंदिन जीवनात तुम्हीसुद्धा मसूर डाळीचा वापर करता का? जाणून घ्या मसूर डाळ खाण्याचे फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.