खाण्यायोग्य कापूरचे आरोग्याला होणारे फायदे
भारतासह इतर सर्वच ठिकाणी कपूरचा वापर पूजा, होम आणि धार्मिक गोष्टींमध्ये केला जातो. पूजेच्या वेळी कपूरच्या गोळ्या पेटवून पूजा केली जाते. कपूरचा वापर फक्त पूजेसाठीच नाहीतर इतरही अनेक कारणांसाठी केला जातो. मागील अनेक वर्षांपासून आयुर्वेदामध्ये कपूरचा वापर औषध म्हणून केला जात आहे. कपूरचा वापर अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. कपूरचे दोन प्रकार आहेत. त्यातील की म्हन्जे खाण्याचा कापूर आणि दुसरा म्हणजे दुसरा सिंथेटिक कापूर. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सिंथेटिक कापूर वापरला जातो. तसेच हा कापूर आरोग्यासंबंधित समस्यांवर सुद्धा प्रभावी आहे. खाण्याचा कापूर बाजारात कुठेही सहज उपलब्ध होतो.
कापूरच्या झाडावरील लाकडांपासून आणि सालींपासून भीमसेनी कापूर तयार केले जाते. हा कापूर दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. दक्षिण भारतासह इतर ठिकाणी या कापूरचा वापर खाण्यासाठी आणि इतर पदार्थांमध्ये टाकण्यासाठी सुद्धा केला जातो. खाण्याच्या कापूर पासून अनेक पदार्थ आणि गुणकारी औषध बनवली जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कापूर खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: तिरुपतीच्या मंदिरात प्रसादासाठी बनवला जाणारा लाडू आता घरीच बनवा, वाचा रेसिपी
सर्वच घरांमध्ये पूजेसाठी आणि इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी कापूरचा वापर केला जातो. तसेच पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा कापूर हा नैसर्गिक रित्या बनवला जातो. या कापूरचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. खाण्याच्या कापूरचे सेवन केल्यामुळे त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारते. तसेच वजन नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते इत्यादी अनेक फायदे होतात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात खाण्याच्या कापूरचे सेवन करावे. सतत होणाऱ्या धावपळीचा परिणाम हळूहळू आरोग्यावर दिसू लागतो. यामुळे अनेकदा लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. खाण्याच्या कापूरचे सेवन केल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.
शरीराचे रक्तभिसरण सुरळीत झाल्यानंतर आरोग्य सुधारण्यास मदत होते. खाण्यायोग्य कापूरचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि आरोग्याला सुद्धा फायदे होतात.
हे देखील वाचा: तिरुपती बालाजी मंदिरात केस दान का करतात? जाणून घ्या कथा
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर सर्दी किंवा खोकला होण्याची शक्यता असते. पण खाण्यायोग्य कापूरचे सेवन केल्यामुळे कफ बाहेर पडून खोकला थांबतो. तसेच तज्ज्ञांच्या मते जास्त प्रमाणात सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर खाण्यायोग्य कापूरचे सेवन केल्यास सर्दी खोकला कमी होतो.