(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
अलिकडे सोशल मिडियावर लग्नसमारंभात झालेल्या अपघाताचा किंवा एका फजितीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, लग्नाचे दृश्य दाखवले आहे. वधू हळूहळू स्टेजवर येते, माळा घेऊन. वर आधीच स्टेजवर उभा आहे, हसत आहे आणि त्यांचे दोन्ही कुटुंब जवळच उभे आहेत, या खास क्षणाची वाट पाहत आहेत. वातावरण उत्साह आणि आनंदाने भरलेले दिसते. वधू स्टेजवर पोहोचताच माळा देण्यासाठी पुढे सरकते तेव्हा अचानक स्टेज जोरदार खाली कोसळतो. स्टेजबरोबरच वर आणि वधू देखील जमिनीवर कोसळतात. आता ही घटना पाहताच आपल्याला वधू आणि वराविषयी वाईट वाटते पण खरा ट्वीस्ट वेगळाच आहे. खरंतर, हा व्हिडिओ खरा नसून एआयद्वारे त्याला तयार करण्यात आले आहे. व्हिडिओ खरा नसला तरी यातील दृष्य आता यूजर्सना खळखळून हसवत आहे.
हा व्हिडिओ @lndiawire नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा स्पष्टपणे एआय व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्टेजने वधूचं वजव पाहताच आपला श्वास सोडला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे तर असं झालं की, हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






