काय होणार रोज पांढरा भात खाल्याने? मधुमेह असणाऱ्यांसाठी ३ बेस्ट राईस कोणते? वाचा सविस्तर (फोटो सौजन्य- pinterest)
आपण जेवण करतो तेव्हा आपल्या ताटात चपाती, भाजी आणि भात हे असतंच. एखाद वेळेस आपल्याला जेवणात चपाती नसली तरी चालतं, परंतु भात नसला कि जेवण आपलं अपूर्ण वाटत. दोन घासच का होईना पण भात हे जेवणात पाहिजे. भारतात कोणत्याही भागात जा भात हा जेवणात आवडता भाग आहे. तसं जर पाहायला गेलं तर भारतात अनेक प्रकारचे तांदूळ मिळतात. मात्र सगळ्यात जास्त खाण्यात येतो तो पॉप्युलर नॉर्मल वाईट राईस, मात्र हे पांढरे तांदूळ रोज खाणे चांगले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. डॉ मधुमेह असणाऱ्यांना भात खाण्यास नकार देतात. परंतु भात हा आवडीचा असल्याने भात न खाणे हा एक मोठा टास्क असतो. यावर विवेक मित्तल ने एक व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे.
लहान मुलांसाठी कडक उन्हाळ्यात बनवा थंडगार Falooda, नोट करून घ्या फालुदा बनवण्याची सोपी रेसिपी
कोण आहेत विवेक मित्तल ?
विवेक मित्तल फिटनेस एन्थूजीऐस्ट आणि कंटेंटन्ट क्रिएटर आहे. फिट युट्यूबरच्या नावाने त्यांचा चॅनेल आहे. विवेक मित्तलने त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की रोज जेवणात पांढरा भात खाल्याने काय होणार.
काय होणार रोज पांढरा भात खाल्याने?
त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले कि रोज नियंत्रणाशिवाय भात खाल्याने बॉडी फॅट आणि डायबिटीज होण्याचा धोका वाढू शकतो. याचा कारण असा की पांढऱ्या भातात फायबर आणि माइक्रोन्यूट्रिएंट्सची कमी असते. रोज पांढरा भात खायचा असेल तर याच्यासोबत फायबर, प्रोटीन रिच सब्जी/ कढी, आणि घी सोबत खाल्याने चांगले राहील. ज्याला मधुमेह आहे त्याने भात खाऊ नये.
मधुमेह असणाऱ्यांसाठी ३ ऑप्शन
विवेक मित्तल ने सांगितले कि तीन अश्या प्रकारचे तांदूळ आहेत जे मधुमेह असणारे लोक खाऊ शकतात. ब्राऊन राईस, ब्लॅक राईस आणि रेड राईस हे तीन राईस आहेत जे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी चांगले आहे. या तांदळात फायबर आणि बिकॉम्प्लेक्स, सिलेनियम, मॅग्निशियम सारखे माइक्रोन्यूट्रिएंट्स जास्त असतात. ज्यामुळे ते खरोखरच मधुमेहींसाठी अनुकूल बनतात.