महागड्या साडयांना सेफ्टी पिनमुळे बारीक होल पडतात? मग वापरून पहा 'या' सोप्या टिप्स
सर्वच महिलांना साडी नेसायला खूप आवडते. सिल्क साडी, बनारसी साडी, कांजीवरम साडी इत्यादी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या बाजारात उपलब्ध आहेत. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर महिला सुंदर सुंदर साड्या नेसतात. साडी नेसल्यामुळे महिलांच्या सौदंर्यात आणखीनच वाढ होते. महागड्या, डायमंड वर्क केलेल्या, भरजरी साड्या खूप कमी नेसल्या जातात. महागड्या साड्या खराब होऊ नयेत म्हणून महिला त्यांची खूप जास्त काळजी घेतात. वजनाने जड असलेल्या साड्या परिधान केल्यानंतर त्यामध्ये वावरताना अनेक अडचणी निर्माण होतात. साडी नेसताना साडीच्या पदराला सेफ्टी पिन लावले जाते.(फोटो सौजन्य – pinterest)
लग्नसमारंभात परिधान करा ठसठशीत ‘टेम्पल ज्वेलरी’, चारचौघांमध्ये दिसाल आकर्षिक
महागड्या आणि वर्क केलेल्या साडयांना सेफ्टी पिन लावल्यामुळे काहीवेळा साडीचा एकदा धागा निघून येतो आणि त्यानंतर हळूहळू साडीचे पूर्णच घागे निघू लागतात. याशिवाय साडीला लावलेला पिन व्यवस्थित न काढल्यामुळे साडी फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महागड्या साडयांना कशा पद्धतीने सेफ्टी पिन लावावा, याबद्दल काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
महागड्या आणि डिझायनर साडीचे कापड खराब होऊ नये म्हणून साडीला पिन लावताना रंगीत बटणाचा वापर करावा. यामुळे साडीचे धागे व्यवस्थित राहतात. साडी किंवा ओढ़णीवर सेफ्टी पिन लावताना बटन लावून ओवून घ्या. हा उपाय केल्यामुळे साडीचे फ्रॅब्रिक फाटणार नाही आणि साडी जशीच्या तशी व्यवस्थित टिकून राहील.
साडी किंवा ओढणीमध्ये सेफ्टी पिन अडकू नये म्हणून मोत्याचा वापर करावा. साडीच्या पदराला पिन लावताना सगळ्यात आधी पिनमध्ये किंवा साडीवर मोती ठेवून नंतर साडीला पिन लावावा. यामुळे साडी कोणत्याही ठिकाणी अडकल्यास किंवा ओढली गेल्यास फाटणार नाही. महागडी साडी परिधान केल्यानंतर सेफ्टी पिन लावताना मोती नक्की वापरून पहा.
महागडी साडी तशी आहे तशीच राहण्यासाठी सेफ्टी पिन लावताना लहानशा तुकड्याचा वापर करावा. सगळ्यात आधी कागदावर पिन लावून नंतर तो साडी किंवा ओढणीवर लावावा. सिल्क साड्या खराब होऊ नये म्हणून पदराला पिन लावताना कागद्याच्या छोट्या तुकड्याचा वापर करावा.
उन्हाळ्यात साडीवर ट्राय करा स्टयलिश स्लिव्ह्जलेस ब्लाऊज! ‘या’ डिझाइन्स दिसतील सर्वच साड्यांवर सुंदर
कपाळावर लावलेली जाणारी टिकली अनेकी गोष्टींसाठी वापरली जाते. यासाठी टिकलीवर सेफ्टी पिन लावून नंतर पदरावर किंवा ओढणीवर तुम्ही सेफ्टी पिन लावू शकता. यामुळे कपड्यावर कोणत्याही प्रकारचे होल किंवा धागे निघून येणार नाहीत. साडी नेसताना योग्य ती काळजी घेतल्यास साडीची गुणवत्ता खराब होणार नाही. तुमची साडी नव्यासारखी तशीच राहील.