पुरुषांनी शरीराच्या कोणत्या भागाला लाऊ नये गरम पाणी?
थंडीत आंघोळ करणं हे आव्हानापेक्षा कमी नाही. पण हेच जर गरम पाण्याने आंघोळ करायची असेल तर अनेकांना थंडीत अत्यंत गरम पाण्यात आंघोळ करायला आवडते. हिवाळ्यात थंड पाणी पाहून लोक थरथर कापायला लागतात आणि आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात. बरेच लोक खूप गरम पाण्याने आंघोळ करतात, जे त्वचेसाठी धोकादायकच नाही तर प्रजनन क्षमता देखील नष्ट करू शकते. हो तुम्ही योग्य वाचले आहे आणि हे अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे.
गरम पाण्याने आंघोळ केल्याने किंवा गरम पाण्याच्या टबमध्ये बराच वेळ बसून राहिल्याने तुम्हाला सर्दीपासून आराम मिळतो, परंतु जाणूनबुजून किंवा नकळत तुम्ही तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवत आहात. तज्ज्ञांच्या मते पुरुषांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर गरम पाणी टाकू नये, अन्यथा त्यांना वंध्यत्व येऊ शकते. काय सांगतो अभ्यास? (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो अभ्यास
हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, पुरुषांच्या अंडकोषाचे (Testicle) तापमान शरीराच्या इतर भागाच्या तापमानापेक्षा 4 अंश सेल्सिअस कमी असते. यामुळे Sperm Production चांगले होते आणि प्रजनन क्षमताही वाढते. जेव्हा पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर गरम पाणी ओतले जाते तेव्हा त्याचे तापमान वाढते, ज्यामुळे शुक्राणूंच्या उत्पादनावर आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होते. शास्त्रज्ञांच्या मते, जर पुरुषांच्या Private Part चे तापमान 1-2 अंशांनी वाढले तर ते पुरुषांच्या पुनरुत्पादक आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकते.
पुरूषांच्या 5 वाईट सवयींमुळे लहान होतो प्रायव्हेट पार्ट, या चुका कधीच करू नका
नक्की काय होतो परिणाम
तज्ज्ञांच्या मते, गरम पाण्याचा टब, गोल्ड बाथ आणि हॉट शॉवर घेतल्याने पुरुषांचे स्पर्म सेल्स अर्थात शुक्राणू पेशी जास्त गरम होऊ शकतात, ज्यामुळे शुक्राणूंचे कार्य बिघडू शकते. दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होते आणि मुलांना गर्भधारणेमध्ये समस्या निर्माण होतात.
आयुर्वेदात असेही मानले जाते की पुरुषांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर गरम पाणी टाकू नये, अन्यथा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जरी तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल, तरीही तुमचे अंडकोष अर्थात प्रायव्हेट पार्ट धुताना सामान्य पाण्याने धुवा जेणेकरून त्यांच्या पेशी जास्त गरम होणार नाहीत आणि प्रजननक्षमतेला धोका निर्माण होईल.
हेल्दी डाएट
हिवाळ्यात प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी लोकांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा आणि सकस आहार घ्यावा. फळे आणि भाज्यांनी युक्त आहार प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय अल्कोहोल आणि सिगारेटच्या वापरामुळे प्रजनन क्षमता नष्ट होऊ शकते.
अशा परिस्थितीत या गोष्टींपासून दूर राहणेच फायद्याचे आहे. याशिवाय जास्त ताणतणावामुळे प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. तणाव टाळणेदेखील खूप महत्वाचे आहे. नियमित व्यायाम केल्यास शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होते. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.