हळदीचे आरोग्याला होणारे फायदे
भारतीय मसाल्यांमध्ये हळद प्रामुख्याने वापरली जाते. जेवणाची चव आणि रंग वाढवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठीच नाहीतर त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत. हळदीचा वापर शुभ कार्यात देखील केला जातो. हळदीमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स, विटामिन सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. जखम झाल्यानंतर किंवा लागल्यानंतर सगळ्यात आधी हळद लावली जाते. हळद जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिनमुळे हळदीला पिवळा रंग येतो. तो रंग आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला असंख्य फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला हळदीचे सेवन केल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाऊन घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
अनेकदा काही कारणांमुळे शरीराला सूज येते. शरीराला सूज आल्यानंतर संपूर्ण शरीर विचित्र दिसू लागते. अशावेळी शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी हळदीचा वापर करावा. सांधेदुखी, हाडांचे दुखणे जाणवू लागल्यास हळदीचे सेवन करावे. हळदीमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीराची सूज कमी करण्यासाठी प्रभावी ठरते.
हळदीचे आरोग्याला होणारे फायदे
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर नैराश्य, मानसिक तणाव इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी हळदी गुणकारी आहे. कर्क्यूमिन डिप्रेशनची लक्षणे कमी करण्यास मदत करते. हळदीचा आहारात समावेश केल्याने व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात अनेक बदल होतात.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढू लागतात. हे आजार शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी करण्यास मदत करतात. अल्झायमर सारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी हळद गुणकारी आहे. अल्झायमर हा एक गंभीर आजार आहे. यामुळे संज्ञानात्मक कार्यावर परिणाम होतो.
हळदीचे आरोग्याला होणारे फायदे
व्यस्थ जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊन जातो. याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी गंभीर आजार होण्याची शक्यता असते. हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी हळद प्रभावी आहे.