HMPV
चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) ची प्रकरणे वाढल्यानंतर आता मलेशियामध्येही या विषाणूची चिंता वाढली आहे. मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने देशात एचएमपीव्ही संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाल्याची पुष्टी दिली आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे आरोग्य सेवेवर ताण वाढत आहे.
चीननंतर आता भारतामध्येही 8 महिन्यांच्या चिमुकलीमध्ये हा व्हायरस आढळला असून तिच्यावर उपचार चालू आहेत. भारतामध्ये आजच पहिला रूग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता HMPV चा कहर सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे, घेऊया आपण अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
HMPV नक्की काय आहे?
एचएमपीव्ही हा श्वसन संसर्गाचा एक प्रकार आहे, जो लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर वेगाने परिणाम करतो. त्याची लक्षणे सहसा फ्लूसारखी असतात, ज्यामध्ये ताप, घसा खवखवणे, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण येते. हा विषाणू गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस होऊ शकतो. सध्या या आजाराने चीनमध्ये हाहाःकार माजवला असून इतर देशांमध्येही हा वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.
मलेशियात वाढत आहेत केसेस
मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की अलिकडच्या आठवड्यात HMPV संसर्गाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. रूग्णालयांमध्ये लहान मुले आणि वृद्ध रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यापैकी अनेकांना श्वासोच्छवासाचा गंभीर त्रास होत आहे. त्यामुळे मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत सतर्कतेची घोषणा केली आहे.
आरोग्य मंत्रालयाचे अपील
मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आणि वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मास्क घालण्याचा आणि नियमित हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय, मुले आणि वृद्धांना घरातच ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे, कारण ते सहजपणे विषाणूला बळी पडू शकतात.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
एचएमपीव्हीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्याच्या मुख्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
HMPV विषाणूचा जगभरात कहर, जाणून घ्या नवीन आलेल्या गंभीर विषाणूची लक्षणे
जगासाठी धोक्याची घंटा
चीनमध्ये HMPV प्रकरणे आधीच वाढत आहेत आणि आता मलेशियामध्ये या विषाणूचा उद्रेक जागतिक आरोग्य तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. हा विषाणू झपाट्याने पसरणार असून, यावर नियंत्रण मिळवले नाही तर कोविड-19 सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सगळ्याच ठिकाणी आरोग्य यंत्रणा सज्ज होण्याची गरज भासणार आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.