अनियमित मासिक पाळीसाठी घरगुती उपाय
महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी मासिक पाळी नियमित असणे आवश्यक आहे. अन्यथा महिलांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. महिलांना मासिक पाळीच्या 4 दिवसांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि शरीरात निर्माण झालेल्या खाण्यापिण्याच्या कमतरतेमुळे महिलांना अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. महिलांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होतात. शिवाय शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. शरीरामध्ये हार्मोन्स असंतुलन झाल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रामध्ये बदल होऊ लागतो. मासिक पाळीचे चक्र बदल्यानंतर काहींना पीसीओडीचा त्रास जाणवतो तर काहींची मासिक पाळी अनियमित होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अनियमित मासिक पाळीच्या साम्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हळदीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय पोषक आहेत. दैनंदिन आहारात हळदीचा वापर करावा. शिवाय यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यासाठी हळद अतिशय प्रभावी आहे. अनियमित मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांनी कोमट दुधात हळद मिक्स करून दुधाचेसेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे हार्मोन्सचे असंतुलन कमी होऊन मासिक पाळी वेळेवर येते.
पपई खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. दैनंदिन आहारात पपईचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्याला फायदा सुद्धा होईल. यामध्ये कॅरोटीन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे गर्भाशयाच्या कार्यक्षमतेला चालना मिळते. तर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर आहारात पपईचे सेवन करावे. यामुळे रक्तभिसरण सुधारते.
आवळ्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात आवळ्याचे किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीर सुधारते. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला ताकद मिळते आणि ऊर्जा वाढते. आवळ्याचे सेवन केल्यामुळे हार्मोनची पातळी सुधारते आणि मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.
दैनंदिन आहारात अळशीच्या बियांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अळशीच्या बियांमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात, ज्यामुळे मासिक पाळीच्या वेदना आणि अनियमित मासिक पाळीपासून सुटका मिळते. अळसीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात आढळून येते.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
धार्मिक गोष्टींमध्ये तुळशीच्या पानांना विशेष महत्व आहे. तसेच नियमित एक तुळशीचे पान चावून खाल्यास आरोग्यसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे एक ग्लासभर पाणी गरम करून त्यात तुळशीची पाने टाकून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर उकळवून घेतलेले पाणी गाळून प्या. या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.