(फोटो सौजन्य: istock)
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांचे वजन झपाट्याने वाढू लागले आहे ज्यामुळे बरेचजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणा हा साधा वाटत असला तरी यामुळे आरोग्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशात वेळीच आपले वाढलेले वजन कमी करणे फायद्याचे ठरेल. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवत असते.
एकदा का आपले वजन वाढले की ते कमी करणे फार कठीण होऊन बसते. अनेक प्रयत्न करूनही आपले वजन काही कमी होण्याचे नाव घेत नाही. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका ड्रिंकविषयी सांगत आहोत ज्याचे नियमित सेवन झपाट्याने तुमचे वाढलेले वजन कमी करेल. वर्कआऊटसोबतच या ज्यूसचा तुमच्या डाएट प्लॅनमध्येही समावेश करा. हे ज्यूस तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम वाढवून तुमचा वजन कमी करण्यास बरीच मदत करतो.
अशाप्रकारे घरीच बनवा ड्रिंक
घरच्या घरी वजन कमी करणारे हे ड्रिंक तयार करण्यासाठी तुम्हाला बीटरूट, आवळा, काकडी, गाजर आणि कोथिंबीरीची पान घ्यावी लागतील. या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाकून नीट बारीक करा आणि याचा ज्यूस तयार करा. सतत वाढणारे वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्ही हे ड्रिंक रोज नियमितपणे प्यायला हवे. या ड्रिंकच्या सेवनाने तुमच्या शरीरातील वाढलेली अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होऊ लागेल.
फ्रीजमध्ये ठेवताच विषाचे रूप घेतात ‘या’ भाज्या; कधीही ही चूक करू नका, वेळीच व्हा सावध
ड्रिंकचे फायदे
बीटरूट, आवळा, काकडी, गाजर आणि कोथिंबीरच्या पानांमध्ये आढळणारी सर्व पोषक तत्वे केवळ तुमच्या शरीराची चयापचय क्रिया वाढवतात असे नाही तर तुमच्या शरीरात जमा होणारी अतिरिक्त चरबी वेगाने जाळून टाकण्यासाठी देखील ते प्रभावी ठरू शकतात. लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी, तुम्ही या ड्रिंकला तुमच्या रोजच्या आहाराचा भाग देखील बनवू शकता. फक्त एका महिन्याच्या आत तुम्हाला आपोआप सकारात्मक परिणाम दिसू लागतील.
जर तुम्हाला तुमच्या आतड्याचे आरोग्य सुधारायचे असेल तर तुम्ही हे पेय रोज पिण्यास सुरुवात करू शकता. या पेयामध्ये आढळणारे घटक तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. याशिवाय शरीराला डिटॉक्स करण्यासाठीही या ड्रिंकचे सेवन केले जाऊ शकते. याशिवाय, हे ड्रिंक रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.