मुत्राशयाचा आजार म्हटला की शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते हेच एक कारण जास्त प्रचलित आहे. पण फक्त कमी पाणी पिणं किंवा बाहेरचं खाणं पिणं असणं हे एकच कारण आहे का मुत्राशययाचा आजार होण्यासाठी ? याचं उत्तर आहे नाही. खरंतर पाणी कमी पिणं याबरोबर इतर अन्य कारणं देखील आहेत जी क्षुल्लक वाटतात पण त्याचे परिणाम फार भयानक होतात. ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं मुत्राशयाच्या आजाराने निधन झालं आणि संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली.
मुत्राशयाचा आजार हा सऱ्हास सर्वांमध्ये दिसून येतो. खरंतर वेळेवर न जेवणं, कमी पाणी पिणं किंवा अपुरी झोप ही सर्वात मोठी कारणं आहेत मुत्राशयाच्या आजाराची. अभिनेते सतीश शहा हे देखील या आजाराने ग्रासले होते. तसं पाहायला गेलं तर अनेक सेलिब्रिटींना मुत्राशयाचा गंभीर आजार झालेला होता काहींनी त्यावर मात केली तर काहींचा या आजाराने बळी घेतला. दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांना देखील मुत्राशयाचा कॅन्सर झालेला मात्र योग्य ते उपचार वेळेत मिळाल्याने ते या आजारातून बचावले. त्याचबरोबर बॉलीवूड सुपरस्टार विनोद खन्ना यांना देखील मुत्राशयाचा कॅन्सर झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. कन्नड अभिनेता शिवकुमार यांना देखील मुत्राशयाचा आजार झालेला मात्र त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. थोडक्यात काय सेलिब्रिटींमध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे.
स्वत:च्या शरीराला पुरेसा वेळ न देणं, स्वत:ची काळजी न घेण. सेलिब्रटी असो किंवा वर्किंग माणसं धावपळीच्य़ा आयुष्यात वेळेवर जेवण न करणं, पुरेसं पाणी न पिणं या बरोबर सर्वात मोठं कारण म्हणजे अपुरी झोप. होतं काय तर अपुऱ्य़ा झोपेने शरीराची झीज जास्त होते. य़ुरीनमध्ये मीठाचं प्रमाण वाढतं आणि यामुळे मुत्राशयाचे आजार बळावतात. युरीन इन्फेक्शन होण्याची तशी अनेक कारणं आहेत मात्र त्यात अपुरी झोप होणं हे देखील मोठं कारण आहे. दिवसभर शुटींग किंवा इतर आऊटडोर कामांमुळे लघवी रोखून ठेवली जाते, यामुळे देखील हे आजार जास्त बळावता. त्याबरोबर येतं ते सर्वात मोठं कारण म्हणजे ताण तणाव. मानसिक नैराश्याचा सर्वात गंभीर परिणाम मुत्राशयावर होतो, असं तज्ज्ञांच म्हणणं आहे.
पुरेसं पाणी प्या
दिवसाला किमान ८–१० ग्लास पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. नारळपाणी, जिरेपाणी, दुधी भोपळ्याचा रस यामुळे मुत्रपिंड स्वच्छ राहण्यास मदत होते.
आहारात बदल करा
तिखट, मसालेदार, मीठ जास्त असलेले पदार्थ टाळा.फळं, भाज्या, ताक, दुधी भोपळा, कोथिंबीर, जिरे यांचा समावेश करा.मद्यपान, चहा-कॉफी, आणि कोल्ड ड्रिंक्स यांचं सेवन कमी करा. ताप, पाठदुखी, रक्तमूत्र या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. वारंवार लघवी लागली की रोखून ठेवू नका. असं आरोग्यतज्ज्ञांकडून सांगितलं जातं.






