प्रत्येक घरात पालींनी धुडगूस घातला आहे. पालीला भिंतीवर पाहिल्यानंतर अनेकांना किळस आल्यासारखा वाटतो. भिंतीवर पाल आल्यानंतर लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं भीती वाटते. पण काहीवेळेस पालींमुळे अन्नाचे मोठे नुकसान होत. अनेकदा या पाली कपड्यांमध्ये सुद्धा लपून बसतात. पाली घरात आल्यानंतर घरातील किडे मुग्यांना खातात पण तरीसुद्धा त्यांना पाहणं अनेकांना आवडत नाही. पालींना बाहेर काढण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण तरीसुद्धा पाली घरामध्ये येतात. त्यामुळे पालींना घरातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. नेमके कोणते घरगुती उपाय केल्याने पाली घरातून बाहेर जातील चला तर पाहुयात..
पालींना घराबाहेर काढण्याचे घरगुती उपाय:
काळीमिरी स्प्रे:
घरामध्ये पाल आल्यानंतर भिंतीवर लगेच काळीमिरीचा स्प्रे मारा. त्यामुळे पालीच्या शरीराची जळजळ होईल. तसेच घरातील कानाकोपऱ्यात, पाल येणाऱ्या भिंतीवर काळीमिरीचा स्प्रे मारून ठेवा. काळीमिरीच्या वासाने पाल घरात येणार नाही. काळीमिरीच्या स्प्रेने तुम्ही घरातील इतर किडे मुग्यांना बाहेर घालवू शकता.
[read_also content=”उन्हाळ्यात केवळ पांढऱ्या रंगाचे कपडे न घालता ‘या’ रंगाचे कपडे नक्की वापरून पाहा https://www.navarashtra.com/lifestyle/dont-just-wear-white-clothes-in-summer-try-this-color-clothes-nrsk-535593.html”]
नॅप्थालीन गोळ्या:
घरातील कपाटात किंवा इतर काही ठिकाणी नॅप्थालीन गोळ्या ठेवल्या जातात. कीटकांपासून कपडे वाचवण्यासाठी नॅप्थालीन गोळ्या फायदेशीर आहेत. या गोळ्यांच्या मदतीने तुम्ही पालीला देखील घराबाहेर काढू शकता. पाल किंवा इतर किडे मुग्यांना नॅप्थालीन गोळ्यांचा वास आवडत नाही. त्यामुळे घराच्या कान्याकोपऱ्यात जेव्हा तुम्ही या गोळ्या ठेवता तेव्हा पाल घरात येत नाही.
अंड्याची साल:
घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंड्याची साल लावल्याने पाली घरात येत नाहीत. अंड फोडल्यानंतर त्याची साल टाकून न देता घरातील कोणत्याही कोपऱ्यात लावल्याने पाल घरत येणार नाही. अंड्याच्या वासाला आणि आकाराला बघून पाली पळून जातात.मात्र अंड्याच्या साली दर ४ ते ५ दिवसांनी बदलणे आवश्यक आहे.
[read_also content=”मानसिक शांतता आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहात तर दुधाचे हे ४ उपाय करा https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-are-suffering-from-mental-peace-and-financial-problems-try-these-4-milk-remedie-535499.html”]
कांदा आणि लसूण:
कांदा आणि लसणीचा वास अतिशय उग्र असतो. कांदा लसणीच्या वासाने पाली पळून जातात. त्यांना कांदा लसणीचा वास आवडत नाही. घरच्या कान्याकोपऱ्यात कांदा आणि लसणीचे तुकडे किंवा त्याचा रस स्प्रे केल्याने पाल घरात येत नाही.






