नखांवरील ग्लो वाढवण्यासाठी घरगुती उपाय
सुंदर गुलाबी आणि स्वच्छ नखं सगळ्यांचं आवडतात. हातांचे सौंदर्य वाढवण्याचे काम नखं करतात. त्यामुळे अनेक महिला मुली नखांची व्यवस्थित काळजी घेता. हातांची शोभा नखांमुळे वाढते. पण अनेकदा शरीरात कॅल्शियम आणि विटामिनची कमतरता जाणवू लागली की शरीरासोबतच नखांवरसुद्धा परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी नेहमी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. नखं सुंदर दिसावी म्हणून अनेक महिला नखांना मेनिक्युअर करणे, नेलपेंट लावणे, नखांना शेप देणे इत्यादी अनेक उपाय करत असतात. हे उपाय करून नखांची काळजी घेतली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुलाबी आणि सुंदर नखं मिळवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यानंतर तुमच्या नखांवरील चमक कायम टिकून राहील आणि नखं सुंदर दिसतील.(फोटो सौजन्य-istock)
पण सतत घरातील कामे, सतत पाण्यात काम केल्यामुळे आणि इतर काही कारणांमुळे नखांवरील ग्लो निघून जातो आणि नखं खराब होण्यास सुरुवात होते. नखांवरील ग्लो निघून गेल्यानंतर नखं अधिक रुक्ष, निस्तेज, कोरडी दिसू लागतात. अशावेळी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन काहींना काही ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे नखं काहीकाळ सुंदर दिसतात, मात्र पुन्हा एकदा होती तशीच होऊन जातात. त्यामुळे नखांवर ग्लो वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा. यामुळे तुमची नखं सुंदर आणि चमकदार होतील.
हे देखील वाचा: झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुतल्यास त्वचेला होतील आश्चर्यकारक फायदे, त्वचा होईल सुंदर मऊ
कॅल्शियम युक्त दुधाचा वापर नखांचा ग्लो वाढवण्यासाठी सुद्धा केला जातो. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म नखं सुंदर आणि मजबूत करण्यासाठी मदत करतात. दुधामध्ये विटामिन ए, बी१२, कॅल्शियम आणि प्रोटीन इत्यादी घटक आढळून येतात. नखांच्या निरोगी आरोग्यासाठी वाटीभर दूध घेऊन त्यात नखं ५ ते १० मिनिटं बुडवून ठेवा. त्यानंतर पाण्याने नखं स्वच्छ धुवा. यामुळे नखांवर नैसर्गिक चमक येईल.
कोरफड जेलचा वापर त्वचेसोबतच नखं सुंदर दिसण्यासाठीसुद्धा केला जातो. कोरफड जेलमध्ये विटामिन -ई आणि अनेक अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळून येतात. यासाठी कोरफडचा ताजा रस घेऊन नखांच्या आजूबाजूला सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर 10 मिनिटं हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर कोमट पाण्याने नखं स्वच्छ करा. हा उपाय केल्यामुळे नखांवरील चमक वाढेल.
हे देखील वाचा: काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी ‘या’ बियांचा वापर करून बनवा बर्फाचे खडे, त्वचेवरील येईल ग्लो
नखांच्या आरोग्यासाठी कॉफी पर्याय आहे. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आरोग्यासोबतच नखांसाठी सुद्धा प्रभावी ठरते. यामुळे नखांवरील मृत त्वचा निघून जाऊन नखं सुंदर दिसू लागतात. वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात मध मिक्स करा. तयार केलेले मिश्रण नखांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे नखं स्वच्छ होतील आणि सुंदर दिसतील.