फोटो सौजन्य - Social Media
शाळा, हॉस्पिटल, आश्रम किंवा हॉस्टेल! दुर्घटना कुठेही घडू शकतात. पण काही ठिकाणी घडलेली घटना कायमची आठवण बनते, अगदी भयकथेसारखी! अशीच एक थरकाप उडवणारी घटना चंदीगढमधील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये घडली. हे हॉस्टेल बाहेरून अगदी सामान्य दिसत असलं, तरी आतल्या भिंतींमध्ये एक काळं रहस्य दडलेलं आहे.
या हॉस्टेलमध्ये एकदा सुदा नावाची एक ट्रान्सजेंडर विद्यार्थीनी राहत होती. सुदा तशी शांत स्वभावाची, पण अभ्यासात फारशी पुढे नव्हती. तिच्या ओळखीमुळे हॉस्टेलमधील काही मुली तिची सतत चेष्टा करत, तिला वेगळी वागणूक देत. वर्गात, कँटीनमध्ये, कॉरिडॉरमध्ये सगळीकडे तिचा अपमान होत असे. हा मानसिक छळ दिवसेंदिवस वाढत गेला आणि सुदा आतून मोडून पडली. एका रात्री, सगळे झोपेत असताना, सुदाने तिला सतत त्रास देणाऱ्या एका मुलीला गाठलं आणि रागाच्या भरात तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः वरच्या माळ्यावर गेली आणि पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी जेव्हा सगळ्यांनी हे दृश्य पाहिलं, तेव्हा हॉस्टेलभर किंचाळ्यांचा गोंधळ झाला. पोलिस आले, प्रकरण बंद झालं, पण त्या घटनेनंतर हॉस्टेलचं वातावरण कायमच बदललं.
पुढील काही दिवसांत विचित्र गोष्टी घडू लागल्या. रात्री अचानक टाळ्यांचा आवाज ऐकू येई, कोणाचं तरी नाव कुजबुजल्यासारखं वाटे. काही मुलींनी सांगितलं की, त्यांनी माळ्यावर पंख्याला लटकलेली सावली पाहिली. काहींना झोपेत कोणी तरी गळा दाबतंय असं जाणवत असे. आठवडाभरात अर्ध्या मुलींनी हॉस्टेल सोडून दिलं. आज त्या इमारतीवर जाड कुलूप आहे. आत फक्त एक वॉचमन पहारा देतो. तो सांगतो “रात्री बारा वाजता वरच्या माळ्यावरून टाळ्यांचा आवाज येतो, आणि कधी कधी सुदाची आकृती गळफास घेतलेली दिसते…”
ते गर्ल्स हॉस्टेल आता ‘भुतांचं ठिकाण’ म्हणून ओळखलं जातं. लोक म्हणतात, जो वरच्या माळ्यावर गेला, तो पुन्हा खाली परतलाच नाही.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)






