हिरवळ असो वा औद्योगिकरण, समुद्र असो वा खाडी! विरार सर्वगुण संपन्न आहे. अर्नाळा आणि आगाशी जवळ स्थित असणारे सर्व धर्मीय पूज्य स्थळे लोकांसाठी प्रमुख आकर्षण आहेत. दरम्यान, याच विरारमध्ये अशी ही एक जागा आहे, जिथे दिवसा तरी कुणी गेलं तर सहसा परतत नाही. ते स्थळ अनुभवाची खान आहे.
विरारच्या पूर्वेकडे तशी वर्दळ कमी असते. येथे वस्ती कमी आहे आणि रान मोठे आहे. याच रानात एका स्वस्त घरात दिनेश आणि रमेश दोघे पेइन गेस्ट म्हणून राहत होते. मध्य रात्रीच्या सुमारास त्यांना काही कारणाने मुंबईकडे रवाना व्हावे लागले. दरम्यान, विरार स्टेशनकडे जाऊन त्यांना शेवटची लोकल पकडायची होती. त्या वेळी रिक्षा वगैरे काहीच उपल्बध नसल्याने, शेजारच्या पांडूला उठवून, त्याच्या बाईकवर ट्रिपल सीटने तिघे विरार स्टेशनकडे निघाले.
रात्रीचे १ वाजले होते. गाडी सुसाट चालली होती. रस्त्यावर एक गाडी नव्हती. हे तिघेच मस्त मगन वाऱ्याच्या वेगात स्टेशनकडे जात होते. चहूबाजूला अंधारच अंधार! त्या अंधारात वाट काढत, गाडी एका जागेवर स्तब्ध उभी झाली. दिनेश आणि रमेश पांडुवर भडकले. “का अशा अंधारात थांबवली आहेस गाडी? आधीच आम्हाला उशीर झाला आहे.” असे म्हणत दिनेश वैतागला होता. पांडू म्हणतो, “काय माहित रे! अचानक गाडी थांबलीये.” अनेक कठोर प्रयत्नांनंतर, गाडी सुरु होते. त्या अंधारात गाडीचा प्रकाशही कमी पडत होता.
भयानक म्हणजे गाडीला कितीही accelerator दिले तरी गाडी २० च्या पुढे काही जात नव्हती. अगदी सायकलीच्या वेगाने ती गाडी पुढे जात होती. तितक्यात गाडीचा प्रकाश आपोआप बंद पडला. गाडीही जागेवर थांबली. तिघांच्या चेहऱ्यावर घाम होता. पांडू गाडी चालू करण्यासाठी कठोर प्रयत्न करत होता. पण त्याच्या प्रयत्नांना यश आले. गाडीचा प्रकाश सुरु झाला. जसा प्रकाश सुरु झाला, त्या तिघांना गाडीच्या समोर तीन विचित्र आकृत्या दिसल्या: एक आजी (जिच्या एका डोळ्यातून रक्त वाहत होते), एका पुरुष (ज्याला धडाच्या चिंध्या झाल्या होत्या), एक लहान मुलगी (जिच्या हसण्यातही एक वेगळी भयाणता होती).
त्यांना पाहून यांच्या दात खिळ्या बसल्या. पायाखालची जमीन सरकली. पांडूने कशी बशी गाडी सुरु केली आणि आधी पेक्षाही वाऱ्याच्या वेगात, स्टेशनकडे नेली. पांडू तापाने फणफणत होता. दिनेश आणि रमेश, दोघेही घाबरलेल्या अवस्थेत ट्रेनमध्ये जाऊन चढले. पण पांडू स्टेशनवरच राहिला. त्याची घरी जायची हिम्मतच होईना. सकाळ झाल्यावर तो घराकडे गेले.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)