फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात वायुप्रदूषण (Air Pollution) हे आरोग्यासाठी मोठं संकट बनलं आहे. याचा परिणाम केवळ फुफ्फुसांवर किंवा त्वचेवरच होत नाही, तर आपल्या डोळ्यांवरही थेट होतो. धूर, धूळ, आणि हवेत मिसळलेल्या हानिकारक वायूंमुळे डोळ्यांत जळजळ, खाज, लालसरपणा, कोरडेपणा (Dryness) आणि अॅलर्जी सारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. चला पाहूया वायुप्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे
सनग्लासेसचा वापर करा
बाहेर पडताना नेहमी सनग्लासेस वापरा. हे केवळ सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांपासूनच नाही, तर धूळ आणि धुरापासूनही डोळ्यांचे रक्षण करतात. एंटी-ग्लेर आणि यूव्ही प्रोटेक्शन असलेले चष्मे सर्वोत्तम असतात.
डोळे स्वच्छ ठेवा
दिवसभरानंतर डोळे थंड आणि स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे प्रदूषणाचे कण निघून जातात आणि डोळ्यांना ताजेतवाने वाटते. मात्र डोळे चोळू नका, अन्यथा इन्फेक्शनचा धोका वाढतो.
कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना काळजी घ्या
प्रदूषणाच्या वातावरणात कॉन्टॅक्ट लेन्स लावणे टाळा. धूळकण लेन्सवर चिकटून संसर्ग होऊ शकतो. जर लावणे आवश्यक असेल, तर स्वच्छतेची पूर्ण खबरदारी घ्या आणि वरून प्रोटेक्टिव्ह गॉगल्स वापरा.
डोळे चोळण्याची सवय टाळा
खाज किंवा जळजळ झाल्यास डोळे चोळू नका. असे केल्याने प्रदूषणाचे कण आत जातात. त्याऐवजी थंड पाण्याने डोळे धुवा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्स वापरा.
स्वच्छतेची काळजी घ्या
डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. अस्वच्छ हातांमुळे डोळ्यांमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते.
पुरेसं पाणी प्या
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास डोळे कोरडे पडतात. म्हणून दिवसभर पुरेसं पाणी प्या. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ल्युब्रिकेंट आय ड्रॉप्स वापरू शकता.
घरातील हवा शुद्ध ठेवा
इनडोअर पॉल्युशनसुद्धा डोळ्यांसाठी हानिकारक असतो. घरात एअर प्यूरीफायर वापरा आणि एलोवेरा, मनी प्लांटसारखी झाडं लावा. घरात धूम्रपान टाळा, ज्यामुळे हवा स्वच्छ राहील.
पौष्टिक आहार घ्या
व्हिटॅमिन ए, सी आणि ई डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. आहारात गाजर, पालक, संत्री आणि बदाम यांचा समावेश करा. हे डोळ्यांना आतून मजबूत बनवतात.
साफ हवा मिळणं आज कठीण झालं असलं तरी, काही साध्या सवयी अंगीकारून आपण आपल्या डोळ्यांना वायुप्रदूषणाच्या परिणामांपासून सुरक्षित ठेवू शकतो.






