(फोटो सौजन्य: Pinterest)
फरसबी ही एक अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट भाजी आहे जी महाराष्ट्राच्या स्वयंपाकात नियमितपणे केली जाते. ही भाजी प्रथिनांनी समृद्ध असून त्यात भरपूर प्रमाणात तंतुमय घटक (फायबर) असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. फरसबीची भाजी विशेषतः दैनंदिन जेवणासाठी योग्य असते कारण ती हलकी, झटपट तयार होणारी आणि चवीने अप्रतिम असते. पारंपरिक मराठी स्वयंपाकात भाजी प्रामुख्याने बनवली जाते. तुम्ही रात्रीच्या जेवणात या भाजीचा समावेश करू शकता. पारंपरिक मसाले टाकून तयार केलेली झणझणीत फारसबीची भाजी चवीला फार छान लागते आणि आपल्या आरोग्याचीही काळजी घेते. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी ‘सोया चिली’
साहित्य:
कृती:
फरसबीचे आरोग्याला होणारे फायदे
हाडांना मजबूत करते – फरसबीमध्ये व्हिटॅमिन के, ए आणि कॅल्शियमचे मुबलक प्रमाण आढळून येते जे हाडांना मजबूत आणि बळकट बनवण्यास मदत करते.
पचन सुधारते – फरसबीमध्ये फायबर आढळून येते, जे पचनक्रिया सुरळीत करुन बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
वजन नियंत्रित करते – फरसबीमध्ये फायबर आणि प्रथिनांचा साठा आढळला जातो जो वजन कमी करण्यास किंवा नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, याचे सेवन अधिक काळापर्यंत पोटाला भरलेले ठेवते.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते – व्हिटॅमिन ए असल्याने फरसबीचे सेवन डोळ्यांसाठीही फायद्याचे ठरते.






