कमी वयात 'या' कारणांमुळे महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येते म्हातारपण
सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेशिअल केले जाते तर कधी वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेवर ग्लो आणला जातो. चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, मुरुम आणि इतर समस्या कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण सतत चुकीचे स्किन केअर, केमिकल युक्त क्रीमचा वापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहचते आणि तरुण वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. यासोबतच जीवनशैलीत फॉलो केलेल्या चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यासोबतच चेहऱ्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे चेहऱ्यावरील चमक कमी होऊन त्वचा अधिकच निस्तेज होऊन जाते. त्वचेचे सौंदर्य कमी झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी केवळ स्किन केअर प्रॉडक्टच नाहीतर आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या कारणांमुळे त्वचा तरुण वयात म्हातारी दिसते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
हल्ली लहान मुलांपासून सगळ्यांचं बाहेरचे तेलकट तिखट पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. कायमच पिझ्झा,बर्गर, सँडविच इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात कायमच सुका मेवा, फळे आणि पालेभाज्यांचे सेवन करावे. यामुळे शरीरासह त्वचेला अनेक फायदे होतात. जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
दीर्घकाळ निरोगी आणि चेहऱ्यावरील ग्लो टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते. नियमित ७ ते ८ ग्लास पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर डिहायड्रेट होते आणि त्वचा कोरडी पडते. चेहऱ्यावर ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
शरीरात निर्माण झालेली झोपेची कमतरता संपूर्ण शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे. काहींना रात्ररात्र जागून काम करण्याची सवय असते. यामुळे झोपेच्या सवयींमध्ये बदल होतो. झोपेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे कायमच ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. झोपल्यामुळे आरोग्य सुधारते.






