स्वस्तातील वंध्यत्वाचे उपाय ठरू शकतात त्रासदायक (फोटो सौजन्य - iStock)
किंमत आणि मूल्य यांच्यातील फरक
आयव्हीएफ ही संसाधनकेंद्री प्रक्रिया असल्याचे नागपूरच्या बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्हीफमधील फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. प्रमोद मधुकर येरणे सांगतात. जागतिक पद्धतींविषयीच्या एका सर्वसमावेशक अहवालानुसार, आयव्हीएफच्या सरासरी खर्चात विस्तृत तफावती असल्या तरीही अगदी कमी संसाधने असलेल्या ठिकाणीही या उपचारांचा खर्च बराच असतो. स्टिम्युलेशन नियमांचे अगदीच किमान स्तरावर पालन, स्वस्त औषधांचा वापर किंवा प्रयोगशाळेतील प्रक्रियांचे सुलभीकरण यांद्वारे काही क्लिनिक्समध्ये हा खर्च कमी होतो. मात्र, वरकरणी खर्च कमी झाल्यासारखे वाटले तरी दर्जा नियंत्रणाच्या महत्त्वपूर्ण उपायांसोबत तडजोड झाल्यामुळे हे महागात पडू शकते. नियमांमध्ये काही बदल केल्यामुळे औषधांचा खर्च कमी होत असला आणि अंडाशयांच्या अतिउत्तेजनाची जोखीम कमी होत असली तरी त्यातून कमी अंडी निर्माण होतात (कधी-कधी तर केवळ १-३), त्यामुळे गर्भांची संख्याही कमी होते असे ‘मिनिमल स्टिम्युलेशन आयव्हीएफ’वर झालेल्या संशोधनात दिसून आले आहे.
गर्भांची निर्मिती कमी झाल्यास प्रत्येक चक्रातील गर्भधारणेची संभाव्यता कमी होते. उदाहरणार्थ, तरुण स्त्रियांमधील पारंपरिक आयव्हीएफ आणि मिनिमल-स्टिम्युलेशन प्रोटोकॉल यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता, मिनिमल-स्टिम्युलेशन प्रोटोकॉल गटातील स्त्रियांमध्ये गर्भधारणेचे प्रमाण तुलनेने कमी दिसून आले.
पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा
अधिक चक्रे, अधिक ताण, अधिक खर्च
प्रत्येक चक्रात यश मिळण्याचा दर कमी झाल्यास गर्भधारणेसाठी अधिक चक्रांमधून जाण्याची आवश्यकता सहसा निर्माण होते. सुरुवातीला ‘बजेट आयव्हीएफ’ वाटणारा पर्याय भावनिक आणि आर्थिक अशा दोन्ही बाजूंनी त्रासदायक होतो. कारण, जोडप्यांना वारंवार या चक्रांतून जावे लागते. अनेक चक्रांमधून जावे लागल्यास औषधांचा व प्रक्रियांचा खर्च तर वाढतोच पण भावनिक ताण तसेच अनिश्चितताही वाढते.
शिवाय, यशाचा दर अधिक असलेल्या क्लिनिक्सचा कल अधिक दर लावण्याकडे असतो हे तर नक्कीच. लाइव्ह-बर्थ-रेट असलेल्या क्लिनिक्सचे दरही चढे असल्याचे यूकेमध्ये झालेल्या एका राष्ट्रव्यापी आढावा अभ्यासात दिसून आले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर: सिद्ध झालेला दर्जा व सातत्यपूर्ण निष्पत्ती यांसाठी बहुतेकदा किंमत मोजावी लागते पण अखेरीस त्यांतून चांगले मूल्य मिळते, विशेषत: आयव्हीएफच्या अनेक चक्रांतून जावे लागण्यापेक्षा ही किंमत मोजणे लाभाचे असते.
परवडण्याजोगा दराचा भ्रम
कमी खर्चातील आयव्हीएफ उपचार आपल्या आवाक्यातील आहेत असे वाटू शकते पण एका चक्रात काम न झाल्यामुळे अनेक आयव्हीएफ चक्रांतून जावे लागल्यास निकोप गर्भधारणा साध्य करण्याचा एकूण खर्च हा अपेक्षेहून खूपच वाढू शकतो. शिवाय, वय, अंडकोशातील शिल्लक साठा, वीर्य व गर्भाचा दर्जा, गर्भाशयाची निकोपता आणि जीवनशैली यांचाही यशस्वीतेवर लक्षणीय परिणाम होत असतो. स्वस्त उपचारपद्धती या जीवशास्त्रीय वास्तवांमध्ये बदल घडवून आणू शकत नाही.
योग्य पर्यायाची निवड: नेमके काय बघाल?
माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय हा दराच्या पलीकडे जाणारा असावा. संभाव्य रुग्णांनी पुढील मुद्दयांचे मूल्यमापन केले पाहिजे:
वंध्यत्व निवारण उपचार घेताना सर्वांत स्वस्त भासणारा पर्याय हा दीर्घकाळात आर्थिकदृष्ट्या किफायतशीर क्वचितच ठरतो. ‘बजेट IVF’ सायकल आपल्या आवाक्यातील आहे असे पहिल्या पायरीवर वाटू शकते पण अनेक जोडप्यांना त्यामुळे पुन्हा-पुन्हा त्या चक्रांतून जावे लागते, त्यांच्यावरील भावनिक ताण वाढतो आणि एकूण खर्चही वाढतो. आर्थिक आणि व्यक्तिगत दोन्ही स्तरांवर हे खर्चिक ठरते. वंध्यत्व निवारणातील मूल्य हे सर्वांत कमी दरांमध्ये नव्हे, तर समजूतदार, पुराव्यावर आधारित पद्धतींमध्ये सामावलेले आहे. या पद्धतींमुळे नि:संदिग्धता व प्रामाणिकपणा यांच्या माध्यमातून निकोप गर्भधारणेची संभाव्यता जास्तीत-जास्त वाढते.
10 तासांपेक्षा झोपणे ठरू शकते गंभीर, वंध्यत्व-डायबिटीससह 5 आजारांचा वाढतो धोका






