नाश्त्यासाठी बनवा सफरचंद मखाणा स्मुदी
सकाळी उठल्यानंतर काहींना सगळ्यात आधी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण हा चहा कॉफी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे शक्यतो सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थ खाल्ल्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. दिवसाची सुरुवात पौष्टीक आणि हेल्दी नाश्त्याने झाली तर संपूर्ण दिवससुद्धा छान जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी अॅपल-मखाणा स्मुदी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनवता येते.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मखाणा खाल्ले जातात. आरोग्यासाठी गुणकारी असलेले मखाणा खाल्ल्यानंतर पोटही भरलेले राहते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये मखाणाचे सेवन करावे. सफरचंदमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे साथीच्या आजारांमुळे शरीराचे होणारे नुकसान टाळता येते. यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह मोठ्या प्रमाणात आढळून येते. रिकाम्या पोटी मखाणा खाल्ल्यामुळे रक्तदाबासारख्या अनेक समस्या कमी होऊन होतात. तसेच हाडांचे आरोग्य सुधारते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मकापासून तयार करा खुसखुशीत भजी; नक्कीच बनवा ‘ही’ रेसिपी






