लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट चणाडाळ कोबी
कोबीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर सर्वच मुलं नाक मुरडतात. कोबीच्या भाजीचा वास अनेकांना आवडत नाही.पण कोबीची भाजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. या भाजीमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चणाडाळ कोबी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलं भाज्या खाण्यास कायमच नकार देतात. पण कोबीच्या भाजीपासून बनवलेले मंचुरियन किंवा चायनीज भेळ आवडीने खातात. लहान मुलांच्या आरोग्यासाठी सगळ्याच्या भाजी गुणकारी ठरतात. सकाळी उठल्यानंतर घाईगडबडीच्या वेळी डब्यासाठी कोणती भाजी बनवावी, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी कोबीची भाजी तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चणाडाळ कोबी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात करा अळशीच्या चटणीचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी