सकाळच्या नाश्त्यात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा काकडीची भाकरी
सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काहीं नवीन आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नाश्त्यात नेहमी पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावे. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. बऱ्याचदा घरात कोकणातील पारंपरिक पद्धतीने घावणे बनवले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं घावणे खायला खूप आवडतात. तांदळाच्या पिठापासून बनवलेला पदार्थ पचनास अतिशय हलका असतो. म्हणूनच आज आम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट काकडीची भाकरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. याला तौशाची भाकरी असे सुद्धा बोलले जाते. चला तर जाणून घेऊया काकडीची भाकरी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी घरी बनवा थंडगार लिची सरबत, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल