थंडीमध्ये बनवा सोप्या पद्धतीत गूळ राजगिरा चिक्की
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. कारण या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये शक्यतो गरम पदार्थांचे सेवन करावे. थंडी चालू झाल्यानंतर अनेक घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, चिक्की आणि इतर पदार्थ बनवले जातात. थंड वातावरणामुळे सतत काहींना काही खाण्याची इच्छा निर्माण होते. नेहमी नेहमी बाहेरचे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही गुळाची चिक्की बनवू शकता. गुळाची चिक्की आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. शिवाय थंडीत अनेक घरांमध्ये राजगिऱ्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. राजगिऱ्यामध्ये प्रथिने, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये राजगिऱ्याची चिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये राजगिऱ्याचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. यामध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, कॅल्शियम, आयर्न मुबलक प्रमाणात आढळून येते. शिवाय राजगिरा हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. राजगिरा खाल्यामुळे हाडं मजबूत राहतात. केसांच्या मजबूत वाढीसाठी आहारात राजगिऱ्याचे सेवन करावे. वजन कमी कारण्यासाठीसुद्धा तुम्ही आहारात राजगिऱ्याचे सेवन करू शकता. कारण यामध्ये कमी फॅट असतात. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी राजगिरा प्रभावी आहे.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
हिवाळ्यात गूळ खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि विटामिन सी हे पौष्टिक घटक आढळून येतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्याआधी गुळाचे सेवन करावे.