अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत- तिखट मुगडाळ
दिवाळीनिमित्त घरात अनेक गोड तिखट फराळातील पदार्थ बनवले जातात. फराळातील पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. करंजी, लाडू, चकली, शंकरपाळ्या इत्यादी अनेक पदार्थ घरी बनवले जातात. दिवाळीनिमित्त घरी पाहुण्यांना बोलावले जाते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी कायमच बाहेरून ढोकळा, सामोसा किंवा कचोरी आणली जाते. पण कायमच बाहेर विकत मिळणारे पदार्थ बनवण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरातच तिखट कुरकुरीत मुगडाळ बनवू शकता. हा पदार्थ पाहुण्यांसुद्धा खूप जास्त आवडेल. दिवाळीमध्ये कायमच गोड पदार्थ घरी बनवले जातात. पण नेहमीच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही झणझणीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तिखट मुगडाळ हा अतिशय सोपा पर्याय आहे. लहान मुलांना मुगडाळ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच बाजारातून विकतची मुगडाळ आणून खाल्ली जाते. पण घरी बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया मुगडाळ बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
Diwali Special Recipe: भाजणीचा वापर न करता झटपट बनवा कुरकुरीत बटर चकली, काही दिवसांमध्ये होईल फस्त