खासदार धैर्यशील पाटील यांना भाजपचा 'दे धक्का'! राज्यसभा निवडणुकीच्या यादीतून वगळल्याने चर्चेला उधाण
अलिबाग जि.प्र. राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या चार उमेदवारांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवत पक्षाने रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी मिळेल, या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
उमेदवारी जाहीर करताना भाजपने मराठा, दलित, आदिवासी आणि धनगर समाजांचे प्रतिनिधित्व साधण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा संधी देत दलित समाजातील बळकटी कायम राखली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या माध्यमातून मराठा समाज व कोकणाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. नागपूरच्या माजी महापौर माया ईवनाते या आदिवासी समाजातील असून त्यांनाही संधी देण्यात आली आहे.
रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष तसेच खासदार म्हणून धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी मिळेल, असा आशावाद त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत होता. परंतु नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांचा झालेला पराभव चर्चेचा विषय ठरला. स्वतःच्या कुटुंबीयांना निवडून आणण्यात अपयश आल्याने त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रामराव वडकुते हे धनगर समाजातील राजकीय स्थान देण्याचा प्रयत्न झाल्याचे असल्याने त्या समाजाला अधिक मानले जात आहे.
शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धैर्यशील पाटील यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते. मात्र त्यांचा कार्यकाळ अवघ्या सुमारे महिन्यांचा ठरला. या अठरा कालावधीनंतर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही.
राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चाना आले उधाण आले आहे. खासदार व व जिल्हाध्यक्ष म्हणून कामगिरी दिसून न आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या धक्कातंत्राच्या राजकारणात कोणाचे राजकीय भवितव्य कधी उजळेल याचा अंदाज बांधणे कठीण मानले जाते. रामराव वडकुते यांना उमेदवारी आश्चर्याचा धक्का ठरली आहे. या निर्णयामुळे रायगडसह राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चाना उधाण आले आहे.






