सोप्या पद्धतीमध्ये बनवा पोह्याचे कटलेट
सकाळच्या नाश्त्यात सर्वच घरांमध्ये कांदापोहे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही पोह्याचे कटलेट बनवू शकता. पोह्यांचे कटलेट बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. सकाळच्या घाईगडबडीमध्ये तुम्ही पोह्यांचे कटलेट बनवू शकता. अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. मात्र सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळू नये. पोहे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. मात्र अतिप्रमाणात पोह्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यासाठी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा लोहयुक्त बीटचे आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत मटार रोल, वाचा सिंपल रेसिपी