नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत मटार रोल
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. या दिवशी घरातील सर्वच काम खूप आरामात असतात. सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत सगळ्याचं गोष्टी उशिरा होतात. अशावेळी अनेकदा सकाळच्या नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. कांदापोहे, उपमा, इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी मटार रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मटार रोल बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. चवीला गोड असलेले मटार आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. याआधी तुम्ही मटारपासून मटार पुलाव, मटार भाजी, मटार टिक्की इत्यादी पदार्थ खाल्ले असतील, पण आज आम्ही तुम्हाला मटार रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा मसाला फ्रेंच टोस्ट, लहान मुलं खातील आवडीने
लहान मुलांना पालक आवडत नाही? मग सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा पालक चिला