सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रवा पालक डोसा
लहान मोठ्या सगळ्यांचं डोसा हा पदार्थ खूप आवडतो. भारतासह जगभरात सगळीकडे साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध आहेत. साऊथ इंडियन पदार्थांची चव युनिक असल्यामुळे अनेकांना हे पदार्थ खायला खूप आवडतात. इडली, डोसा, सांबर, आप्पे, उपमा इत्यादी पदार्थ सर्वच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवले जातात. याशिवाय सगळ्यात जास्त फेमस असणारा पदार्थ म्हणजे डोसा. साधा डोसा, मसाला डोसा, मैसूर डोसा इत्यादी अनेक डोसाचे प्रकार आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला रवा पालक डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी वेळात झटपट नाश्ता बनवण्याचा असेल तर तुम्ही रवा पालक डोसा बनवू शकता. हा डोसा बनवताना पालकचा जास्त वापर करावा. कारण लहान मुलांसह मोठ्यांना पालेभाज्या खायला आवडत नाही. अशावेळी पालेभाज्यांपासून बनवलेले पदार्थ मुलांना खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया रवा पालक डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नाश्त्यासाठी चवदार पदार्थ हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिस्पी ब्रेड कबाब, वाचा सोपी रेसिपी