पावसाळ्यात कशी घ्याल योनीमार्गाची काळजी
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाणी, विषाणु, तसेच जंतूचा त्वचेशी थेट संपर्क येऊन अनेक त्वचाविकार यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय पावसाळ्यात योनीत संसर्ग होण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये आपण आपल्या त्वचेची आणि योनीमार्गात संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं असते.
मुंबईतील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे म्हणाल्या की, पावसाचे पाणी हवेतील प्रदूषकांमध्ये मिसळते. त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात आणि त्वचेला खाज सुटते. पावसामुळे बुरशीचे प्रमाण वाढते आणि कीटकांची पैदास होते. ज्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. जसे की त्वचेची जळजळ, लालसरपणा, जळजळ, मुरुम, त्वचेचा संसर्ग, पुरळ, बुरशीजन्य संसर्ग आणि चेहर्यावरील फॉलिक्युलायटिस. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – iStock)
योनीतील यीस्टचा संसर्ग
योनीमार्गात होणारा संसर्ग
झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता लाडगुडी म्हणाल्या की, योनिमार्गाचा संसर्ग हा योनीतील यीस्टचा संसर्ग ज्याला कँडिडल व्हल्व्होव्हॅजिनायटिस म्हणून ओळखले जाते. हा एक प्रकारचा संसर्ग आहे जो कँडिडा बुरशी संसर्गामुळे होतो. यामुळे स्त्रीच्या जननेंद्रीयामध्ये अस्वस्थता निर्माण होऊन जळजळ होऊ लागते. प्रत्येक स्त्रीला आयुष्यात एकदा तरी योनिमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
योनीमार्गात संसर्ग का वाढतो?
वातावरणातील आर्द्रता आणि ओलसरपणामुळे पावसाळ्यात यीस्ट इन्फेक्शन, बॅक्टेरिअल वेजिनोसिस, क्लॅमिडीया, युटीआय आणि गोनोरिया होण्याची शक्यता वाढते. वाढलेली आर्द्रता आणि दमटपणा ही बुरशी आणि जीवाणूंच्या प्रजननासाठी पोषक ठरते. योग्य स्वच्छता न पाळल्याने किंवा जास्त घाम येणे यामुळे संवेदनशीलता आणि जळजळ वाढू शकते. खाज सुटणे, सूज येणे, लालसरपणा, पुरळ उठणे, लघवी करताना जळजळ होणे, योनीवाटे पांढरा स्त्राव बाहेर येणे, दुर्गंधी येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळेच पावसाळ्यात योनीमार्गाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
कशी काळजी घ्यावी
इन्फेक्शन न होण्यासाठी घ्यायची काळजी
डॉ. शरीफा पुढे म्हणाल्या की, पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करा, तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळा, त्वचेवर मॉइश्चरायझर वापरणे महत्वाचे आहे. नितळ त्वचेसाठी स्वत: कोणतीही उत्पादने वापरू नका. त्वचेचा संसर्ग असल्याचे जाणवल्यास तातडीने त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सोपे उपाय