दातदुखीवरील सोपा घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)
घरगुती उपाय आणि पारंपरिक आयुर्वेदिक उपाय आपण जेव्हा शोधतो त्यामध्ये सर्वात वर नाव असते ते म्हणजे स्वयंपाकघरातील हिंगाचे. हिंग हे केवळ आपल्या जेवणाचा स्वादच वाढवते असं नाही तर त्यासह अनेक आजार दूर पळविण्याचे कामही हिंग करते. हिंगामधील औषधीय गुण हे पोटातील गॅस, अपचन आणि पोटदुखीसारखे आजार त्वरीत गायब करते. अगदी नवजात बाळाचा गॅसचा त्रासही हिंगामुळे पटकन कमी होतो. अगदी आजीच्या बटव्यातील हा उपाय आहे. आरोग्यासाठी हिंगाला ‘खजिना’ अशीच ओळख मिळाली आहे.
पण तुम्हाला माहीत आहे का? हिंगाचा उपयोग दातदुखीसाठीही करता येतो. हो हे खरं आहे. अचानक रात्री तुम्हाला दातदुखीचा त्रास होत असेल आणि कोणत्याही डॉक्टरांकडे जाणं शक्य नसेल तर तुम्ही हिंगाचा उपयोग करून घेऊ शकता. अगदी अभ्यासांमध्येही हे सिद्ध करण्यात आले आहे. याबाबत लेखातून आपण अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो अभ्यास
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (NLM) च्या एका अभ्यासानुसार, हिंग पारंपारिकपणे डांग्या खोकला, दमा, अल्सर, अपस्मार, पोटदुखी, पोट फुगणे, ब्राँकायटिस, आतड्यांना नुकसान करणारे बॅक्टेरिया, पेटके, कमकुवत पचन आणि इन्फ्लूएंझा यासारख्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. हिंगाचे आय़ुर्वेदिक नाव फेरुला asafoetida आहे, जे भारताच्या दक्षिणेकडील प्रांतात आढळते. हिंग प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून भारतात आयात केले जाते; काही प्रमाणात हिंग उझबेकिस्तान आणि इराणमधूनदेखील आयात केले जाते.
Toothache: थंडीत दातदुखीने झालात हैराण? किचनमधील पदार्थ ठरेल रामबाण उपाय
दातदुखीवर उत्तम
दातदुखीवरील घरगुती उपाय
चुटकीभर हिंगाचा वापर हा दातदुखीपासून सुटका मिळवून देण्यासाठी उत्तम ठरतो. दातामध्ये दुखायला लागल्यानंतर तुम्ही हिंगात कापूर मिक्स करून दातदुखीच्या ठिकाणी लावल्यास तुम्हाला त्वरीत आराम मिळू शकतो. घरगुती उपायांबाबत जर बोलायचे झाले तर तुम्ही कानातदेखील तिळाच्या तेलात हिंग गरम करा आणि मग थंड करून कानात त्याचे थेंब घाला, यामुळे दातदुखी थांबेल आणि त्वरीत आराम मिळेल. मात्र हे करताना आपण मोठ्यांचे मार्गदर्शन घ्या. स्वतःच्या मनाने काहीही करू नका.
पचनासाठी उत्तम
हिंगामुळे उत्तम पचन
चरक संहितेत पचन सुधारण्यासाठी, गॅस आणि पोटफुगी कमी करण्यासाठी आणि अपचन सारख्या समस्या दूर करण्यासाठी हिंग उपयुक्त मानले जाते. ज्यांना भूक लागत नाही किंवा अन्न पचवण्यात समस्या येत आहेत त्यांच्यासाठी हिंग अत्यंत उपयुक्त आहे असे आय़ुर्वेदातही सांगण्यात येते.
दातांचा पिवळेपणा, साचलेला थर, पायरिया होईल गायब, बाबा रामदेवने सांगितले घरीच बनवा दंतमंजन
हिंग रोज सेवन करण्याचे फायदे
हिंग ठरते फायदेशीर
दररोज डाळ, कढीपत्ता आणि भाज्यांमध्ये हिंग घातल्याने अन्नाचे पचन सोपे होते. संशोधनातून असे दिसून आले आहे की हिंग शरीरात इन्सुलिन वाढवून रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. हिंगमध्ये कौमरिन नावाचा घटक असतो जो रक्त पातळ करण्यास मदत करतो आणि ते गोठण्यापासून रोखतो. वाढलेले ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉल कमी करून ते उच्च रक्तदाब कमी करते.
हिंगाचे अन्य फायदे
हिंगाचे आरोग्यदायी फायदे
ताकासोबत किंवा जेवणात हिंग मिक्स करून खाल्ल्याने पोटातील वायू, कॉलरा आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. हिंगमध्ये इतकी शक्ती आहे की ते कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींना थांबवते.
प्रसूतीनंतर हिंग खाल्ल्याने गर्भाशय साफ होते आणि पोटाच्या समस्या टाळता येतात. अर्धा कप पाण्यात हिंग मिसळून प्यायल्याने मायग्रेन आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो, परंतु लहान मुले किंवा कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांनी ते वापरण्यापूर्वी नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.