दातदुखीवरील घरगुती उपाय
अनेक वेळा दातदुखी असह्य होते आणि त्यामुळे रात्रीची झोप तर उडतेच पण दैनंदिन दिनचर्येवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. विशेषत: थंडीच्या मोसमात हा त्रास आणखीनच त्रासदायक होतो. आपण अगदी सौम्य वेदनांकडे दुर्लक्ष करू नये कारण यामुळे नंतर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. येथे आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही दातदुखीपासून आराम मिळवू शकता.
हे घरगुती उपाय दंतचिकित्सक हरिष तन्ना यांनी दिले असून प्राथमिक उपाय म्हणून याकडे पाहण्यात यावं. दातदुखीचा त्रास अधिक होत असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला (फोटो सौजन्य – iStock)
मीठ आणि लवंग
लवंग आणि मिठाचा करा उपयोग
किचनमध्ये असणारे मीठ आणि लवंग हे दोन्ही पदार्थ दातांसाठी उत्तम ठरतात. तुम्हाला दातदुखी होत असेल तर सर्वप्रथम लवंगाच्या काही कळ्या बारीक करून घ्या आणि नंतर त्यात मीठ मिसळा. आता हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी दुखणाऱ्या दातांमध्ये दाबून ठेवा. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, तेव्हा वेदना निघून गेली असल्याचे तुमच्या लक्षात येईल. लवंग आणि मिठातील गुणधर्म दातांमधील कीड मारून टाकण्यास मदत करतात आणि त्रास लवकर कमी होतो
हळद आणि मीठ
हळद आणि मिठाचे कॉम्बिनेशन ठरेल रामबाण
हळद हा सर्वगुणसंपन्न असा पदार्थ आहे. हळदीतील अँटीसेप्टिक गुणधर्म अनेक त्रासांवर लाभदायी ठरते. अगदी दातदुखीवरही हळद चांगला उपाय आहे. यासाठी तुम्ही एका लहान भांड्यात एक चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट दातांवर चोळा. हळूहळू असह्य वेदना निघून जातील आणि तुमच्या दाताचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल
किळसवाणे दिसतात पिवळे दात, 3 पदार्थांनी होतील हिऱ्यासारखे चमकदार
कडुलिंबाची पाने
कडुलिंबाच्या पानांचा करा वापर
कडुलिंबाची पाने बारीक करून त्याचा रस काढा आणि कुस्करून घ्या. यामुळे वेदना निर्माण करणारे जीवाणू नष्ट होतील ज्यामुळे दातदुखी कमी होईल. कडुलिंबातील अँटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट्स आणि आयुर्वेदिक गुण दातदुखी कमी करण्यास मदत करतात आणि याशिवाय कडुलिंबाच्या पानामुळे पिवळ्या दातांची समस्या निघून दात स्वच्छ होण्यासही मदत मिळते
कांद्याचे तुकडे
दातदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून वापरा कांदा
कांद्याचा वापर सहसा अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो, परंतु तुम्हाला माहीत आहे का की कांदा कापून दातांमध्ये दाबून धरल्यास वेदना कमी होतात. तुमच्या दातांमधून कळा येत असतील तर त्रास होणाऱ्या ठिकाणी तुम्ही दातात कांद्याचे तुकडे दाबून धरा. थोड्याच वेळात तुम्हाला दातदुखीचा त्रास कमी झालेला दिसून येईल
दातांचा पिवळेपणा, साचलेला थर, पायरिया होईल गायब, बाबा रामदेवने सांगितले घरीच बनवा दंतमंजन
लिंबाचा रस
लिंबाच्या रसाने करा उपाय
लिंबाचा रस हा दात खराब करणाऱ्या बॅक्टेरियाचा शत्रू आहे. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून गार्गल केल्यास दातदुखीपासून आराम मिळेल. लिंबू खरंतर आंबट असल्यामुळे दाताला अधिक त्रास होईल असं वाटत असेल तर असं अजिबात होत नाही. तुम्ही दातदुखीसाठी लिंबाच्या रसाचा वापर बिनधास्त करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.