(फोटो सौजन्य: Pinterest)
अभिनेत्री आणि बिग बॉस १३ ची एक्स स्पर्धक शेफाली जरीवालाचे काल २७ जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या वाघ्या ४२ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याचे सर्वत्र शोककळा पसरली असून मृत्यूआधी तिने बिग बॉस १३ मधील सह-स्पर्धक पारस छाब्रासोबत एक मुलाखत दिली होती ज्यातील एक क्लिप सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये शेफालीने आपल्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले आहे.
शेफालीने काटा लगा गाण्यामध्ये काम केले होते ज्यामुळे ती आजही काटा लगा गर्ल म्हणून नावाजली जाते. तर मुलाखतीत पारसने शेफाली जरीवालाला विचारले की तिला ‘कांता लगा गर्ल’ म्हणून कधी कंटाळा येतो का? यावर शेफालीने हसून उत्तर दिले आणि म्हणाली, “कधीही नाही… संपूर्ण जगात फक्त एकच कांता लगा गर्ल असू शकते आणि ती मी आहे. मला ती खूप आवडते. आणि मला मरेपर्यंत कांता लगा गर्ल म्हणून ओळखले जावो अशी माझी इच्छा आहे”.
तिच्या मृत्यूची बातमी कळताच, शेफालीची ही क्लिप आता खूप जास्त व्हायरल होत आहे. चाहते तिच्या या रीलला पाहून आणखीनच भावुक होत आहेत आणि सध्याचे दृश्य पाहता तिची ही इच्छा खरंच पूर्ण झाल्याचे दिसत आहे, कारण सर्वत्र तिच्या निधनाची बातमी काटा गर्लसहच शेअर केली जात आहे. चाहते हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. त्यांना अभिनेत्रीच्या त्या आयकॉनिक व्हिडिओ गाण्याचीही आठवण येत आहे ज्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
90’s crush, always remembered🙏#ShefaliJariwala pic.twitter.com/VNxwEkv3ui
— Pranjul Sharma (@pranjultweet) June 27, 2025
स्वतःवर प्रेम केलं पाहिजे…
शेफालीच्या या मुलाखतीत हे देखील समजून आले की, ती स्वतःवर खूप जास्त प्रेम करते. अनेकांना स्वतःवर प्रेम करता येत नाही अशात शेफालीची ही गोष्ट आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. महिला घरातली जबाबदारी पूर्ण करतात बऱ्याचदा इतक्या मग्न होतात की स्वतःवर लक्ष देणं विसरून जातात. आपल्या कामांसहच स्वतःला जपता आले पाहिजे. वेळेवर जेवण, स्किन केअर आणि आरोग्याची काळजी घेऊन आपण स्वतःवर प्रेम करू शकता.
हॅन्ड ड्रायरचा अतिवापर होऊ शकतो आरोग्यास घातक! मॉलमधील चकचकीत सोयीमागे दडलेली धोके
दत्तक घेणार होती बाळ…
शेफालीने व्हिडिओमध्ये मुलाला दत्तक घेण्याची इच्छा असल्याचेही स्पष्ट केले. ती म्हणाली, “स्वतःच्या मुलांवर तर सर्वच प्रेम करतात पण आपल्याला दुसऱ्याच्या मुलाला प्रेम देता आले पाहिजे, मी आता त्या पोझिशनला आहे की दुसऱ्याला एक चांगलं आयुष्य देऊ शकते त्यामुळे भविष्यात कधी झालंच तर माझ्या घरीही सर्वांच्या इच्छेने आला तर नवा पाहुणा येईल”.