आंतरराष्ट्रीय मैत्री दिन (Friendship day)दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो, परंतु भारतात तो ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या निमित्ताने मित्रांना शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानण्याचा आणि त्यांच्यासोबतच्या मैत्रीचा आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे. मित्र (Friendship)आपल्या कुटूंबातील नसले तरी ते आपल्याला सर्वात जवळचे असतात. त्यांची विश्वासार्ह सोबत आपल्या भावनिक वाढीस मदत करते. ते तुमच्या आनंदात (happy)तुमच्या सोबत असतात आणि तुमचं दु:ख देखील वाटून घेतात. या खास नात्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ऑगस्टमध्ये मैत्री दिन साजरा केला जातो.
हा दिवस मित्रांना समर्पित आहे. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक असतात. काही चांगले तर काही वाईट असतात. आपल्याला त्यांच्यातील चांगले वाईट गुण ओळखता यायला हवे. मित्र बनवण्याआधीही आपण त्यांच्यातील काही गुण ओळखले पाहिजेत, जेणेकरुन कोणते मित्र (Friendship) वाईट काळात आपली साथ देतील हे आपल्या लक्षात येईल.
तुमचा मित्र प्रामाणिक आहे का ते तुम्ही पहा. तसे न केल्यास भविष्यात तो तुमची फसवणूक करू शकतो. त्यामुले अशा व्यक्तीशी मैत्री करा जी केवळ प्रामाणिकच नाही तर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल. तुमचा मित्र इतरांना नि:स्वार्थपणे मदत करत असेल तर तुम्ही त्या मित्राकडून अपेक्षा करू शकता की भविष्यात जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा तो तुमच्या पाठीशी उभा राहील.
तुम्ही अशा मित्रांची निवड करावी ज्यांची सोबत तुमच्यावर सकारात्मक प्रभाव टाकेल. तुमचा मित्र दारू, धुम्रपान इत्यादीचे सेवन करत तर नाही हे तुम्ही पाहिले पाहिजे. जर तो असे करत असेल तर आपण त्याला समजावून सांगावे की या गोष्टींमुळे त्याचे नुकसान होऊ शकते.तुमचा मित्र आपली चूक कबूल करत असेल आणि माफी मागायला मागेपुढे पाहत नसेल तर याचा अर्थ असा आहे की तो खूप खुल्या मनाचा आहे आणि गर्विष्ठ नाही. असा मित्र भविष्यात कधीही तुमचे मन दुखावणार नाही किंवा तो तुम्हाला वाईट संगतीकडे घेऊन जाणार नाही.