UTI झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न केल्यास भासू शकते डायलीसिसची गरज, शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
यूटीआयपासून बचाव करण्यासाठी उपाय?
इन्फेक्शन वाढण्याची कारणे?
यूटीआय इन्फेक्शन कशामुळे होते?
सर्वच महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार म्हणजे यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI). हा आजार अस्वच्छता, वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर आणि नाजूक अवयवांची काळजी न घेतल्यामुळे होण्याची शक्यता असते. महिला शरीराला झालेला आजरांकडे कायमच दुर्लक्ष करतात. यूटीआय झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. पण कालांतराने लक्षणे वाढू लागतात आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. यूटीआय इन्फेक्शन केवळ युरिनरी ब्लॅडरपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण शरीरात विषाणू पसरण्याची शक्यता असते. हे इन्फेक्शन किडनीच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे शरीरात यूटीआय संबंधित लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा किडनीसंबधीत आजार होऊन डायलीसिस आणि ट्रान्सप्लांटची आवश्यकता भासू शकते. चला तर जाणून घेऊया यूटीआय झाल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे.(फोटो सौजन्य – istock)
महिलांमध्ये यूटीआयचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. हा घातक विषाणू खालून वरच्या दिशेने किडनीकडे येतो. इन्फेक्शन किडनीमध्ये वाढल्यानंतर किडनीचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत पायलोनेफ्रायटिस असे म्हणतात. इन्फेक्शनची लागण झाल्यानंतर ताप, थरथरी, पाठीच्या मागच्या भागात वेदना आणि उलट्या, लघवी करताना खूप जास्त जळजळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे हे इन्फेक्शन साधे नसून संपूर्ण शरीराचे गंभीर नुकसान करू शकते.
किडनीमध्ये जास्त वेळ यूटीआय इन्फेक्शन टिकून राहिल्यास किडनीच्या टिश्यूजवर जखम होण्याची शक्यता असते. यामुळे किडनीची क्षमता हळूहळू कमी होऊन जाते. किडनीसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारे लक्षण म्हणजे रक्तदाबात वारंवार होणारे बदल. किडनीमध्ये झालेले इन्फेक्शन रक्तात पसरल्यास जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करावेत.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. कारण शरीरातील विषारी घटक लघवीतून बाहेर पडून जातात. पण हेच लघवीमध्ये साचून राहिल्यास किडनीच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. तसेच भरपूर पाणी प्यायल्यामुळे पाण्यावाटे शरीरातील घाण आणि विषाणू बाहेर पडून जातात. लघवीला झाल्यानंतर तात्काळ लघवी करावी. लघवी जास्त वेळ थांबवून ठेवू नये. लघवी करताना पोटाच्या खालच्या भागात वेदना किंवा प्रेशर जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
Ans: UTI (Urinary Tract Infection) म्हणजे मूत्रमार्गात होणारा संसर्ग होय. हा संसर्ग किडनी, मूत्राशय किंवा मूत्रमार्गात होऊ शकतो.
Ans: लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी लागणे, लघवीत दुर्गंधी किंवा रक्त येणे, पोटात किंवा कंबरेत वेदना ही सामान्य लक्षणे आहेत.
Ans: पुरेसे पाणी पिणे, स्वच्छता राखणे, लघवी रोखून न ठेवणे आणि योग्य आहार घेणे आवश्यक आहे.






