राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानात शरीर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. दही, ताक, लस्सी, कोल्ड्रिंक इत्यादी सोबतच पाणीदार फळे सुद्धा आवडीने खाल्लेले जातात. फळांचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. यासाठी उन्हाळ्यात कलिंगड आवडीने खाल्लेले जाते. कलिंगडमध्ये असलेले फायबर आणि इतर आवश्यक घटक उष्णतेपासून शरीराचा बचाव करतात. पण काहींच्या आरोग्यासाठी कलिंगड अतिशय धोकादायक ठरते. त्यामुळे कलिंगड खाण्याऐवजी या गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी. या गंभीर आजारांपासून त्रस्त असल्यास कलिंगडाचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य – istock)
वाढत्या उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खात असाल तर थांबा! 'या' लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक

नियमित मद्यपान करणाऱ्या लोकांनी कलिंगड अजिबात खाऊ नये. याशिवाय कलिंगड थंड असल्यामुळे काहींना लगेच सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

कलिंगडामध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. किडनीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी कलिंगड खाऊ नये. यामुळे स्टोन वाढण्यासोबतच दोन्ही किडन्यांना सूज येऊ शकते.

कलिंगडमध्ये खूप जास्त फायबर असते. पोटाच्या आजारांनी असलेल्या लोकांनी आहारात कलिंगड खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण यामध्ये असलेल्या फायबरमुळे जुलाब, गॅस किंवा पोट फुगण्याची शक्यता असते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी वारंवार कलिंगड खाणे घातक ठरू शकते. कारण यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असते, ज्याच्या परिणामामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाधते.

काहींना कलिंगड खाल्ल्यानंतर रॅश, पुरळ किंवा त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकते. रात्रीच्या वेळी उशिरा कलिंगड खाऊ नये. यामुळे वारंवार लघवीला जावे लागते.






