शरीरात मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील स्नायू होतील कमकुवतव
मॅग्नेशियम कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
शरीराला विटामिनची आवश्यकता का असते?
निरोगी राहण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
दीर्घकाळ निरोगी आणि कायमच उत्साही राहण्यासाठी शरीराला विटामिनची खूप जास्त आवश्यकता असते. विटामिन सी, ए, बी, डी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी जीवनसत्वे शरीराचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यास मदत करतात. पण काहीवेळा शरीरातील कोणत्याही एका विटामिनची कमतरता निर्माण झाल्यास संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. शरीराला इतर विटामिनसोबतच मॅग्नेशियमसुद्धा तितकेच आवश्यक आहे. पण या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर यूंचे कार्य, नर्व्हस सिस्टीम, हाडांचे आरोग्य आणि हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि शरीरात होणारे बदल जीवनशैलीत अनेक अडथळे निर्माण करतात. त्यामुळे वाढत्या वयात शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. पण कालांतराने या लक्षणांमध्ये खूप जास्त वाढ होते. शरीरातील ऊर्जा कमी होणे, काम करण्याची इच्छा न होणे, स्नायूंमध्ये गोळे येणे, आकडी येणे, थरथरा भरणे, रात्री पायात क्रॅम्प्स इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय डोकेदुखी, चिडचिड, व्यवस्थित झोप न लागल्यामुळे झोपेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. शरीराला आवश्यक विश्रांती न मिळाल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया मॅग्नेशियम कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात. याशिवाय कधी रक्तदाब वाढतो तर कधी रक्तदाब कमी होऊन हृदयावर जास्तीचा तणाव निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे काम करण्याचा खूप जास्त वैताग येतो आणि काहीच करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे शरीरात निर्माण झालेल्या मॅग्नेशियमच्या कमतरतेकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यानंतर झोपेवर परिणाम दिसून येतो.
शरीरात निर्माण झालेली मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बदल करणे सुद्धा आवश्यक आहे. दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या, बदाम, काजू, शेंगदाणे, बिया, डाळी, केळी आणि संपूर्ण धान्य इत्यादी पदार्थांचे आवश्यक सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. याशिवाय नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित योग, ध्यान किंवा हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. मॅग्नेशियम वाढवण्यासाठी कोणत्याही गोळ्या, सप्लिमेंट्स घेण्याऐवजी घरातील पौष्टिक पदार्थ खावेत.






