RR Vs PBKS Live Streaming (फोटो- ट्विटर)
पंजाब किंग्जने राजस्थानला दिलेले 223 रन्सचे टार्गेट
वैभव सूर्यवंशीने 43 रन्स करत केला नवा रेकॉर्ड
राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
Tata IPL 2026 RR Vs PBKS: आज चंदीगड येथील क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबने मार्कस स्टॉयनीस आणि प्रभसिमरन सिंगच्या खेळीच्या जोरावर 222 रन्स केल्या. राजस्थानला विजयासाठी 223 रन्सची गरज होती. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने चांगली सुरुवात केली. अखेर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा विजयी रथ रोखला आहे. पंजाब किंग्जचा या सामन्यात विकेट्सने पराभव झाला आहे.
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
पंजाब किंग्जने दिलेल्या 223 रन्सचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने डावाची सुरुवात केली वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी करत राजस्थानला चांगली सुरूवात करून दिली. तो 43 रन्स करून आउट झाला. 43 रन्स केल्यावर त्याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. शुभम दुबे आणि डोनोव्हन फेरेराने राजस्थान रॉयल्स अडचणीत सापडली असताना महत्वाची भागीदारी रचत शेवटच्या ओव्हर्समध्ये राजस्थानला विजय मिळवून दिला आहे.
3️⃣rd fifty of the season 👌 Yashasvi Jaiswal departs after a well compiled 51 (27) 👏 Updates ▶️ https://t.co/fBbdVnExPZ#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvRR pic.twitter.com/n0VuTTMa80 — IndianPremierLeague (@IPL) April 28, 2026
वैभव आउट झाल्यावर ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल यांनी डाव सावरला. राजस्थान रॉयल्सने पॉवर प्ले मध्ये 82 रन्स केल्या. यशस्वी जयस्वालने शानदार 51 रन्सची अर्धशतकी खेळी केली. ध्रुव जुरेल 16 रन्स करून आउट झाला. तर रियान परागने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 29 रन्स करून आउट झाला.
पंजाब किंग्जची गोलंदाजी
वैभव आणि यशस्वीच्या जोडीने गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र अर्शदीप सिंगने ही जोडी फोडली. त्याने वैभव सूर्यवंशीला 43 रन्सवर आउट केले. युझवेंद्र चहलने ध्रुव जुरेल आणि कर्णधार रियान परागला आउट केले.
पंजाब किंग्जची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाबला आमंत्रित केले. दरम्यान प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंगने पंजाबच्या डावाची सुरुवात केली.प्रियांश आर्याने डावाची सुरुवात दणक्यात केली. मात्र त्याचे रूपांतर त्याला मोठ्या खेळी करणे शक्य झाले नाही. प्रियांश आर्या 11 बॉलमध्ये 29 रन्स करून आउट झाला. पॉवर प्लेमध्ये पंजाबने 50 पेक्षा जास्त रन्स केल्या.
प्रभसिमरन सिंगने वादळी अर्धशतकी खेळी केली. तो 59 रन्स करून आउट झाला. तर कूपर कॉनली 30 रन्स करून आउट झाला. त्यानंतर श्रेयस आयेर आणि मार्कस स्टॉयनीस खेळण्यासाठी आले. कर्णधार श्रेयस अय्यर आज 21 रन्स करून आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये पंजाब दोनशे रन करू शकेल की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र अखेरच्या ओव्हर्समध्ये मार्कस स्टॉयनीसने 62 रन्सची आक्रमक आणि महत्वाची खेळी करून पंजाबला 222 रन्सपर्यंत पोहोचवले. शेवटच्या ओवरमध्ये त्याने तब्बल 24 रन्स लुटल्या.
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी
राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जला पॉवर प्लेमध्ये मोठी धावसंख्या उभी करण्यापासून काही प्रमाणात रोखले. गेल्या काही सामन्यात घातक ठरत असलेली प्रियांश आर्या आणि प्रभसिमरनची जोडी गोलंदाजांना फोडण्यात यश आले. जोफरा आर्चरने प्रियांश आर्याची विकेट घेतली. पहिला सामना खेळत असलेल्या यश राजने कूपर कॉनलीची विकेट घेतली. तसेच त्याने आक्रमक खेळी करत असलेल्या प्रभसिमरनला देखील आउट केले.
RR Vs PBKS Live: रियान परागने जिंकला टॉस; पीच रिपोर्टचा विचार करून घेतला ‘हा’ निर्णय
पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, मार्को जानसन, विजयकुमार वैसाख, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जयसवाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नंद्रे बर्गर, तुषार देशपांडे, ब्रिजेश शर्मा , रवी बिश्नोई.






