खाल्ल्यानंतर त्वरीत शौचालयात धावत असाल तर नक्की काय होतंय (फोटो सौजन्य - iStock)
शौच ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी शरीर निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाची आहे. ही पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे, जी शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय, शौच केल्याने आतड्यांचे निरोगी सूक्ष्मजीव राखण्यास मदत होते. निरोगी व्यक्ती जवळजवळ दररोज शौच करते. याशिवाय, दिवसातून तीन वेळा ते आठवड्यातून तीन वेळा शौच करणे देखील सामान्य मानले जाते. परंतु असे बरेच लोक आहेत जे अन्न खाल्ल्यानंतर लगेच शौचालयात जातात.
पण असे का होते आणि ते सामान्य आहे का? जर तुमचेही असेच प्रश्न असतील, तर आज या लेखात आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहोत. इन्स्टाग्रामवर डॉ. सेठी यांनी याबाबत सांगितले असून अन्न खाल्ल्यानंतर लगेच शौचालयात जाणे म्हणजे काय आणि असे करणे कितपत योग्य आहे अथवा हा कोणता आजार आहे का? जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
एका दिवसात कितीवेळा शौचाला जाणे योग्य?
शौचास जाणे हे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे, कारण ते आपल्या शरीरात विषारी पदार्थ जमा होण्यास प्रतिबंध करते. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती दिवसातून एकदा शौचास जाते. परंतु जर तुम्ही दररोज शौचास जात नसाल तर याचा अर्थ असा नाही की समस्या आहे. दिवसातून तीन वेळाही शौचालयात जाणे सामान्य आहे. आणि जर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा शौचास जात असाल तर तेदेखील सामान्य मानले जाते.
खाल्ल्यावर त्वरीत शौच
तुम्हाला असे अनेक लोक माहीत असतील किंवा तुम्ही स्वतः अशा लोकांच्या श्रेणीत येत असाल जे जेवणानंतर लगेचच वॉशरूममध्ये जातात, पण प्रश्न असा आहे की हे सामान्य आहे की ते एखाद्या समस्येचे लक्षण आहे? याबद्दल भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर सौरभ सेठी म्हणतात की हे घडणे खूप सामान्य आहे.
डॉ. सेठी यांनी स्पष्ट केले की, हे गॅस्ट्रोकॉलिक रिफ्लेक्स नावाच्या एखाद्या गोष्टीमुळे होते. जेव्हा अन्न तुमच्या पोटात पोहोचते तेव्हा ते तुमच्या कोलनला हालचाल करण्याचे संकेत देते, ज्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की तुम्हाला लवकर वॉशरूममध्ये जावे लागेल. IBS मध्ये हे रिफ्लेक्स अधिक तीव्र असू शकते.
कसा कराल बचाव?
जर तुम्हाला हे वारंवार होत असेल, तर तुम्ही या चार टिप्स वापरून पाहू शकता, ज्यामुळे आराम मिळेल:
Constipation: बद्धकोष्ठता आहे की नाही कसे ओळखाल? डॉक्टरांनी सांगितलेली लक्षणे ओळखाच
डॉ. सेठीची पोस्ट
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.