हात भाजल्यास 'हे' घरगुती उपाय करा
राज्यभरात सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात दिवाळी सण साजरा केला जात आहे. वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. घरोघरी मातीचे दिवे, रंगीत कंदील, रांगोळ्या, फराळ आणि नवीन कपडे घालून छान दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे फटाके फोडले जातात. फटाक्यांशिवाय दिवाळी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. पण फटाके फोडताना आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. लहान मुलांनी केलेल्या छोट्या मोठ्या चुकांमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवाळीमध्ये फटाके फोडताना आरोग्याची सुद्धा तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य-istock)
फटाके फोडताना अनेकदा लहान मुलांना चटका लागतो किंवा हात पाय भाजलेले जातात. अशावेळी अनेक लोक भाजलेल्या हातावर सफेद रंगाची टूथपेस्ट लावतात. पण टूथपेस्ट लावण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ लावावे. जेणेकरून भाजलेली जखम किंवा चटका लागलेला हात लवकर बरा होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया हाताला किंवा पायांना चटका लागल्यानंतर कोणत्या घरगुती उपाय करावे.
हे देखील वाचा: Diwali: शहराचं सांस्कृतिकपण जपण्यासाठी ढोल ताशांना परवानगी दिली पाहिजे- दिपेश म्हात्रे
फटाके फोडताना भाजल्यानंतर किंवा चटका लागल्यानंतर जखम वाढू नये म्हणून सगळ्यात आधी जखम स्वच्छ करून घ्या. जेणेकरून जखम जास्त चिघळणार नाही. घरगुती उपाय करण्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा औषध उपचार करावे. हातावर किंवा इतर ठिकाणी चटका लागलेल्या शरीराच्या अवयवांवर फटाक्यांचा मसाला किंवा बारूद असते. ते स्वच्छ करून घ्यावे. त्यानंतर त्यावर तुमच्याकडे उपलब्ध असलेले कोणतेही मलम किंवा औषध लावा.
जखम झालेल्या ठिकाणी इतर कोणताही पदार्थ लावण्याऐवजी खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेल लावल्यामुळे त्वचेवर थंडावा मिळतो. तसेच जखम थोड्या प्रमाणात बरी झाल्यानंतर खोबऱ्याच्या तेलाने मसाज करावे. जास्त वेळ मसाज करू नये.
हे देखील वाचा: Diwali 2024 : यंदा लक्ष्मीपूजन नेमकं कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा विधी