traffic rules (फोटो सौजन्य- pinterest )
महिना आहे मार्चचा, ट्राफिक पोलिसांकडून आता प्रत्येकव्यक्ती आपली गाडी आणि स्वतःला वाचवून पळ काढण्याच्या तयारीत असतात. ट्राफिक पोलिसांकडून गाडी अडवण्यात येते आणि चौकशी करण्यात येते. याचा कारण म्हणजे मार्च एंडिंग. अनेकांचे म्हणणे आहे की मार्च एंडिंग आली की कारवाई वाढते. मात्र कारवाई वाढण्याचे कारण केवळ मार्च एंडिंग नसून तर नवीन वाहतूक नियम आहेत. हे नवीन नियम १ मार्च २०२५ पासून लागू झाले आहेत. या नवीन नियमानुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या नंतर १० पट दंड ठोठावण्यात येणार आहे.
आपला आर्थिक वर्ष १ एप्रिल पासून सुरु होतो तर मार्च ३१ ला संपतो. मार्च एंडिंग आणि एप्रिलची सुरवात या काळात ट्राफिक पोलिसांकडून प्रत्येक व्यक्ती दूर पळतो. कारण ट्राफिक पोलिसांकडून गाडी अडवण्यात येते आणि चौकशी करण्यात येते. ड्रायविंग लायसेन्स, गाडीचे कागदे, नंबरप्लेट इत्यादी चौकशी करण्यात येते. आता मार्च एंडिंग सुरु आहे. आता ट्राफिक पोलिसांकडून चौकशी करण्यात येते. अनेकांचे म्हणणे आहे की मार्च एंडिंग आली तर वाहतुकीचे नियम वाढतात. मात्र मार्च एंडिंग केवळ कारण नव्हे तर वाहतुकीचे नवीन नियंम आहे. नियम मोडल्यास तीन पट दंड ठोठावण्यात येणार. चला जाणून घेऊयात नवीन नियम काय आहे.
१. जर तुम्ही सीटबेल्टशिवाय वाहन चालवत्त असाल किंवा ट्रिपल सीट प्रवास करत असाल तर यासाठी आता १००० रुपये दंड भरावा लागणार आहे.
२. हेल्मेटशिवाय वाहन चालवताय तर, यासाठी देखील १००० रु. किंवा ३ महिने लायसन्स जप्त करण्यात येणार आहे.
३. जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर १०,००० रुपये दंड आणि ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. पूर्वी हा दंड फक्त १,००० ते १५०० रुपयांच्या दरम्यान होता. जर तुम्ही पुन्हा असे करताना पकडले गेलात तर तुम्हाला १५,००० रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
४. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर ५०० रुपयांऐवजी ५००० रुपये दंड द्यावै लागणार आहे.
५. जर तुम्ही इन्शुरन्सशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला २००० रुपये दंड आणि/किंवा तीन महिन्यांची तुरुंगवास होऊ शकतो.
६. जर मूल १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल आणि तो वाहन चालवताना आढळला तर त्याला २५,००० रुपये दंड आणि ३ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
यासोबतच त्या वाहनाची नोंदणी देखील १ वर्षासाठी रद्द केली जाईल. वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही.
७. जर तुम्ही गाडी चालवताना फोन वापरताना दिसलात तर तुम्हाला ५००० रुपये दंड होऊ शकतो. आधी हा दंड ५०० रुपये होता.
८. नवीन नियमानुसार, सिग्नल तोडल्यास ५००० रुपये दंड आणि वाहन ओव्हरलोड केल्यास २०,००० रुपये दंड भरावा लागेल.
९. रुग्णवाहिकासारख्या आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवला तर त्याला १०,००० रुपये दंड भरावा लागेल.
ईदला भारताचे या ‘७’ मशिदीला एकदातरी द्यावी भेट, येथे वास्तुकला आणि बंधुत्वाची दिसते झलक