त्वचेच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नागवेलीच्या पानांचा करा वापर
प्रत्येक घरातील आजी आजोबा आणि इतर मोठे व्यक्ती नेहमीच पान खातात. या हिरव्यागार पानांना नागवेलीची पाने म्हणतात. याशिवाय या पानांना विड्याची पाने देखील म्हणतात. या पानांचा वापर धार्मिक गोष्टींमध्ये केला जातो. कोणत्याही शुभ कार्यात विड्याच्या पानांना विशेष महत्व आहे. पण या पानांचा वापर या गोष्टींसाठीच नाही तर इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र गोळ्या औषधांचे सेवन करून त्वचेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नागवेलीच्या पानांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. पिंपल्स, मुरूम, त्वचेमध्ये जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नागवेलीच्या पानांचा वापर करावा. नागवेलीची पाने त्वचा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात. त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नागवेलीच्या पानांचा वापर करावा. याशिवाय त्वचेवरील काळे डाग, पिंपल्स आणि इतर समस्या दूर होतात. आज आम्ही तुम्हाला नागवेलीच्या पानांचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
नागवेलीच्या पानांमध्ये असलेले दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. यामुळे पिंपल्स कमी होऊन त्वचा स्वच्छ होते. यासाठी नागवेलीच्या पानांची पेस्ट तयार करून त्वचेवर लावावी. ही पेस्ट १५ मिनिटं त्वचेवर लावून तशीच ठेवावी. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या पानांच्या मिश्रणात तुम्ही कोरफड जेल मिक्स करून लावू शकता.
त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नागवेलीच्या पानांचा वापर करावा. डागविरहित त्वचेसाठी नागवेलीची पाने प्रभावी ठरतात. त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी वाटीमध्ये नागवेलीच्या पानांची पेस्ट आणि मध मिक्स करून घ्यावे. त्यानंतर तयार पेस्ट त्वचेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास त्वचेची गुणवत्ता सुधारेल.
महिनाभर नियमित करा केशरच्या पाण्याचे सेवन, आरोग्यासह त्वचेला सुद्धा होतील चमत्कारीत फायदे
खराब झालेली त्वचा आणि चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी तुम्ही नागवेलीच्या पानांचा वापर करू शकता. उन्हामुळे टॅन झालेली त्वचा उजळ्वण्यासाठी नागवेलीची पाने प्रभावी ठरतील. नागवेलीच्या पानांची पेस्ट तयार करून त्यात तांदळाचे पीठ मिक्स करून घ्या. तयार पेस्ट त्वचेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवरील टॅन कमी होईल.