विषबाधा न होता आतडे चांगले राखण्यासाठी काय खावे
अन्न विषबाधा ही एक समस्या आहे जी कोणत्याही अन्नातून कधीही आणि कोणालाही होऊ शकते. दूषित अन्न किंवा पाण्याच्या सेवनामुळे होणाऱ्या या समस्येमुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि अशक्तपणा यासारख्या समस्या निर्माण होताता. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात त्याचा धोका अधिक वाढलेला दिसतो. पण अलिकडेच एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की काही प्रकारचे अन्न आपल्या आतड्यांना अन्न विषबाधेपासून वाचवण्यास मदत करू शकते. हे पदार्थ आपल्या आतड्यांना बुलेटप्रूफ जॅकेटसारखे संरक्षण देतात.
आम्ही या लेखातून तुम्हाला सांगत आहोत की, अन्न विषबाधा होण्याचे मुख्य कारण म्हणजे जीवाणू, विषाणू आणि परजीवींनी संक्रमित अन्न आहे. जेव्हा हे हानिकारक घटक आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा ते आतड्यांसंबंधी समस्या निर्माण करतात. संशोधनानुसार, आतड्यांचे आरोग्य सुधारून आणि योग्य आहाराचे पालन करून आपण ही समस्या टाळू शकतो (फोटो सौजन्य – iStock)
आतड्यांसाठी खास डाएट
चांगल्या गट हेल्थसाठी काय खावे
डेली मेलमधील एका वृत्तानुसार, संशोधनातून असे दिसून आले आहे की फायबरयुक्त आहार अन्न विषबाधा रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. फायबर आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन देते, जे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते.
संपूर्ण धान्य, डाळी, फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. हे केवळ आतडे स्वच्छ करत नाहीत तर त्यांची प्रतिकारशक्ती देखील मजबूत करतात. याशिवाय, दही, किमची आणि सॉकरक्रॉट सारखे प्रोबायोटिक समृद्ध आहार देखील आतड्यांसाठी वरदान ठरू शकते. हे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका कमी होतो.
अँटीऑक्सिडंट्सयुक्त जेवण
आहारात अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करणे खूप फायदेशीर आहे. हिरव्या भाज्या, बेरी, ग्रीन टी आणि हळद यासारख्या गोष्टी केवळ शरीरातील अशुद्धता बाहेर काढत नाहीत तर आतड्यांचे संरक्षणदेखील सुनिश्चित करतात. अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी शरीराला पाणी देणे देखील खूप महत्वाचे आहे. पुरेसे पाणी पिण्याने आतडे निरोगी राहतात आणि बॅक्टेरियाचा प्रभाव कमी होतो.
आतड्यांमध्ये जमलेली घाण काढून टाकतील ‘हे’ 4 पदार्थ, आताच आहारामध्ये करा समावेश
दही आणि ताकाचे पदार्थ
आहारात दही आणि ताकाच्या पदार्थांचा समावेश करावा
कॅल्शियम, फायबर आणि प्रथिने समृद्ध असलेले दही आपल्या आतड्यांसाठी खूप चांगला पर्याय आहे. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. एवढेच नाही तर ते आतड्यांचे अस्तर सुधारण्यास, जळजळ कमी करण्यास आणि संधिवात आणि दमा सारख्या आजारांना दूर ठेवण्यास मदत करते.
हिरव्या भाज्यांचा समावेश
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर आणि खनिज पोषक तत्व असतात, जे आपल्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे आपले आतडे निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे आहारात नियमित तुम्ही हिरव्या भाज्यांचा समावेश करून घ्यावा आणि या भाज्यांमधील पोषक तत्व शरीरात सामावून घ्यावे
किवी आणि सफरचंद
नाश्त्यात खा किवी आणि सफरचंद
व्हिटॅमिन सी आणि त्यात असलेले अनेक पोषक तत्व आपल्या पचनसंस्थेला बळकटी देऊन आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये किवी खाणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. गट हेल्थसाठी तुम्ही नियमित किवी खावे आणि याशिवाय नाश्त्यामध्ये रोज सफरचंदाचाही समावेश करावा. पेक्टिन आणि फायबरने समृद्ध असलेले सफरचंद आतड्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. म्हणून या सुपर फूड्सना तुमच्या डाएट प्लॅनचा भाग बनवा.
चिया सीड्स आणि आळशी
चिया सीड्स हे फायबर आणि प्रोबायोटिक्सने भरलेले असतात, जे आपल्या आतड्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. फायबरने समृद्ध असलेले जवस बियाणे आतड्यांना विषमुक्त करतात आणि त्यांना नवीन जीवन देतात. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तुम्ही या दोन्ही पदार्थांचा समावेश करून घ्यावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.