पार्लरमध्ये जाऊन महागड्या हेअर केअर ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरी १० रुपयांमध्ये करा हेअर स्पा
कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा आणि आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. केसांची काळजी घेण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले हेअरमास्क, हेअर सिरम इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र केसांवर कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केस सतत गळू लागतात. त्यामुळे कामानिमित्त बाहेर जाताना किंवा उन्हात गेल्यानंतर केसांना स्कर्फ बांधून बाहेर जावे. (फोटो सौजन्य – iStock)
ना राहणार पिंपल्स, ना राहतील डाग; उन्हाळ्यात झोपण्याच्या अगोदर चेहऱ्यावर लावा ‘हा’ तेल
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला हेअर स्पा केला जातो. हेअर स्पा करण्यासाठी अधिकचे पैसे महिला आणि मुलींना मोजावे लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला १० रुपयांमध्ये सोप्या हेअर स्पा करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पदार्थांचा वापर करून हेअर स्पा केल्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. कमीत कमी खर्चात सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही हेअर स्पा करू शकता.
ना राहणार पिंपल्स, ना राहतील डाग; उन्हाळ्यात झोपण्याच्या अगोदर चेहऱ्यावर लावा ‘हा’ तेल
तांदळाचे पीठ जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्या पिठामध्ये असलेले गुणधर्म प्रोटीन आणि विटामिन बी असल्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तांदळाच्या पिठामुळे केस मजबूत होतात. अंड्यामध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रोटीन केसांच्या वाढीसाठी आणि केसांना प्रोटीन देण्यासाठी मदत करतात. केसांना हायड्रेशन देण्यासाठी अंड अतिशय फायदेशीर आहे. चमकदार आणि मजबूत केसांसाठी हेअर स्पा करणे आवश्यक आहे. महिन्यातून एकदा हेअर स्पा केल्यामुळे केसांना पोषण मिळते.