Intermittent Fasting इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे ठराविक काळासाठी कोणत्याही प्रकारचे अन्न वर्ज्य करणे होय. लहान उपवास, दीर्घ उपवास किंवा अधूनमधून उपवास असे केले जाऊ शकतात. अधूनमधून केलेल्या इंटरमिटेंट फास्टींगचं फॅड गेल्या काही वर्षांत जास्त वाढलं आहे. सेलिब्रिटींपासून ते फिटनेस ट्रेनरपर्यंत सर्वच या आहार योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की,इंटरमिटेंट फास्टींगचा परिणाम हा केवळ वेट मॅनेजमेंट करणं आहे. (fasting)(weight management)
संशोधनानुसार, ते अतिरिक्त चरबी बर्न करण्यासाठी मदत होते. आपली बॉडी पुन्हा रिशेपमध्ये येते. या प्रकारच्या आहारामुळे कॅलरीज कंट्रोल ठेवण्यास मदत होते. तसंच, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास इंटरमिटेंट फास्टींगचा उपयोग होतो.
इंटरमिटेंट फास्टींग म्हणजे काय?
अधूनमधून उपवास करणे म्हणजे हेल्दी राहण्याचा एक मार्ग… खाण्याचे तास किंवा जेवणाच्या वेळा ठरवणे. इंटरमिटेंट फास्टींग दरम्यान कॅलरी-युक्त पेये पिऊ शकत नाही.
इंटरमिटेंट फास्टींगमध्ये काय होते?
इंटरमिटेंट फास्टींगने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना नियंत्रित आहाराद्वारे संपूर्ण विश्रांती देऊन नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेस मदत होते. यामुळे शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. फास्टींग करताना होणारे जलद बदल म्हणजे, वजन कमी होण्यास मदत होते. रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी होते, चरबी कमी करणे सोपे होते, चयापचय क्रिया वाढते.
[read_also content=”देशातील 40 टक्के लोकांना ढेरी, महाराष्ट्रातील 25 टक्के लोक लठ्ठ; संशोधनातून माहिती समोर https://www.navarashtra.com/lifestyle/40-percent-of-people-in-the-country-are-obese-25-percent-of-people-in-maharashtra-are-obese-nrka-420119/”]
इंटरमिटेंट फास्टींगचे प्रकार –
16 तासांचे फास्टींग म्हणजेच (ऑटोफेगी) या पद्धतीत, व्यक्ती रात्रीच्या जेवणाच्या वेळी खातो आणि नंतर 16-18 तासांसाठी अन्न सोडतो. या काळात फक्त साधे पाणी घेतले जाते. शरीरात होणारे शारीरिक बदल ऑटोफॅजी म्हणून ओळखले जातात साधारण 12-16 तासांनी यकृतातील ग्लायकोजेन कमी झाल्यावर ऑटोफॅगी सुरू होते.
आठवड्याचे 5 दिवस जेवू शकता पण, 2 दिवस इंटरमिटेंट फास्टिंग करावं लागेल. या पद्धतीमुळे इंटरमिटेंट फास्टिंगची ताकद वाढण्यास मदत होते. यात कॅलरीयुक्त आहार घेण्याची गरज नाही.
इंटरमिटेंट फास्टिंग या पद्धतीमध्ये तुम्ही 10 तास खाऊ शकता आणि 14 तास उपाशी राहायचं.
Eat Fasting Eat
इंटरमिटेंट फास्टींगमध्ये आपण काही पदार्थ रोजच्या आहारातून वर्ज्य करतो.यामुळे इंटरमिटेंट फास्टींग केल्यानंतर हलके अन्न घ्या. जेणेकरून फास्टींगचा हा टप्पा 24 ते 48 तास टिकतो. फास्टींगच्या दरम्यान, लिंबू पाणी, भाज्यांचे सूप, हर्बल- टी आणि भरपूर पाणी तुम्ही घेऊ शकता. इंटरमिटेंट फास्टींगनंतर सूप आणि सलाड किंवा वाफवलेल्या भाज्यांनी खायला सुरूवात करा.त्यानंतर, रोजच्या आहाराकडे वळा.
मात्र, या Intermittent Fasting इंटरमिटेंट फास्टींगबद्दल आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. “इंटरमिटेंट फास्टींग हे दीर्घकाळ टीकणारे नसते. त्यामुळे निसर्गाने जो आहाराचा नियम घालून दिला आहे, तुमच्या देशाप्रमाणे तुमच्या आहाराचे नियोजन करा. चांगले आरोग्य आणि शाश्वत वजन कमी करण्यासाठी चांगल्या सवयी विकसित करा असा सल्ला त्यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमधून दिला आहे”.
इंटरमिटेंट फास्टींग कोणी करू नये-
स्तनपान करणाऱ्या मातांनी आणि गर्भवती महिलांनी इंटरमिटेंट फास्टिंग करू नये. तसेच ज्यांना लो ब्लड शुगर या रुग्णांनी देखील इंटरमिटेंट फास्टिंग करणे टाळा. अथवा करायचे असल्यास सर्वात अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.